शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

अमरावती जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले महिला बचतगटाने कर्ज फेडून केली २८ लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 9:46 AM

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे. येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने कर्ज फेडून ११ वर्षांत तब्बल २८ लाखांची बचत केली.

ठळक मुद्देचार एकर शेताची नफ्यातून केली खरेदी

 

चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे. येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने कर्ज फेडून ११ वर्षांत तब्बल २८ लाखांची बचत केली.सुमारे चार हजार लोकसंख्येच्या दहिगाव (रेचा) येथे २००२ साली ४५ ते ५० वर्षे वयोगटातील १४ महिलांनी सावित्रीबाई फुले बचतगट स्थापन केला. दरमहा ५० रुपये प्रमाणे बचत करणे सुरू केले. दोन वर्षात त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३० हजारांचे कर्ज मिळाले. यातून शेळ्या खरेदी केल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनातून कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली. सुरुवातीला या महिलांनी शेत केले. मिळालेल्या उत्पन्नातून व कर्ज काढून बचतगटाने २००५ मध्ये चार एकर शेत विकत घेतले.कुटुंबाचा गाडा चालवितानाच हप्ते नियमित भरण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच प्रत्येक वर्षी एक लाखाचे उत्पन्न त्यांनी मिळवले. आज या बचत गटातील काही महिला वयाच्या सत्तरीत पोहोचल्या आहेत. बचतीचा भाग वाटून घेण्याचे या महिलांनी ठरवले असून, शेत विक्रीला काढले आहे. या शेताचे आजचे बाजारमूल्य २८ लाख रुपये आहे. बचतगटाच्या मालकीच्या शेतीच्या विक्रीसाठीचा परवानगी अर्ज तहसीलदारांकडे पोहोचला आहे.

या आहेत बचत गटाच्या सदस्य

बचत गटाच्या अध्यक्ष दुर्गा मेश्राम, सचिव अनिता कांबळे असून, शोभा गणवीर, सुनील गजभिये, कुसुम कांबळे, महानंदा कांबळे, अन्नपूर्णा मेश्राम, राजकन्या मेश्राम, शांता ढोक, कांता मेश्राम, रत्ना बोरकर, शिटू बोरकर, भागसा शेंडे, गीता कांबळे या महिलांच्या संघटनातून सावित्रीबाई फुले बचतगटाचे कामकाज यशस्वीपणे चालवीत आहेत.

प्रत्येकीला मिळणार दोन लाखदहमहा ५० रुपयांच्या बचतीने सुरू झालेल्या सभासदांना विक्रीनंतर प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे, मागील ११ वर्षांत या महिलांनी उत्पादनातूनच लागवडीचा व स्वत:च्या मजुरीचाही खर्च काढला. स्वत: केलेल्या कामाचा मोबदला मिळवून घरखर्चातही मदत केली.

दहिगाव येथील सावित्रीबाई फुले गटाचे उत्कृष्ट कामकाज झाले असून, त्यांच्या प्रगतीचे उदाहरण आम्ही इतरांना देत असतो. गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केल्या जातात.-श्रीकांत ठाकरे, तालुका समन्वयक, म.रा. ग्रामीण जीवनोन्नती अभियान

टॅग्स :Womenमहिलाagricultureशेती