पिकअप वाहनासह १२ लाख जप्त, दोन आरोपी ताब्यात
चांदूर रेल्वे : शहरातील स्मशानभूमीजवळ नाकाबंदीदरम्यान १९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता सुगंधी सुपारीसह एकूण ११ लाख ८० हजारांचा जप्त करण्यात आल्या. ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मगन मेहते आणि चांदूर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
पोलीस सूत्रांनुसार, पोलीस उपनिरीक्षक विलास ढोंडे, सहायक उपनिरीक्षक अविनाश देशमुख, जमादार शिवाजी घुगे, नायक पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वाघमारे, कॉन्स्टेबल मनोज वानखडे, भूषण वंजारी व चालक पंकज शेंडे चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर वाहनांची तपासणी करीत असताना एमएच २७ बीक्स ०९४८ क्रमांकाचे पिकअप वाहन दाखल झाले. गॅस शेगडी असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता त्यासोबत सुगंधित सुपारीच्या ४५ गोण्या मिळाल्या. ६ लाख ८० हजार ४०० रुपयांचा हा ऐवज व पाच लाखांचे वाहन पोलिसांनी जप्त केले. आरोपी सैयद नाजिम सैयद यूसुफ (३२) और अब्दुल दानिश अब्दुल रफीक (२५, रा. गुलिस्तानगर, अमरावती) यांना ताब्यत घेऊन न्न्हे दाखल करण्यात आले. जगदीश राठोड, विनोद डाखोरे, अरविंद गिरी, अरुण भुरकडे व रूपेश धारपवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.