नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ऑनलाईन धडे गिरविता येऊ न शकणाऱ्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना ६०६ शिक्षकमित्र अध्यापन करीत आहेत. अतिदुर्गम गावातीलच उच्चशिक्षित युवक-युवती हे कार्य एक छदामही न घेता करीत आहेत.मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या आदिवासी भागात बोंब आहे. त्यामुळे जेथे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, तेथे शिक्षकमित्र सरसावले आहेत. शिक्षक मित्र म्हणून एक छदामही न घेता कल्पना कासदेकर, जुगराम धुर्वे, लक्ष्मी कासदेकर, श्यामलाल कासदेकर, शिवा धिकार, श्यामकुमार बेठेकर, रोशनी येवले आदी सहाशेहून अधिक शिक्षकमित्र पहिली ते दहावीपर्यंत शिकवित आहेत.तालुक्यातील १४२ शाळांपैकी मोबाईल रेंजमधील ३८ गावांत पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आले. यामध्ये ४०७ पालक सहभागी झाले. चौºयामल येथे व्हिडीओ कॉलिंग अॅपचा वापर करून शिक्षणक्रम सुरू झाला आहे.‘मेळघाट पॅटर्न’मेळघाटातील शिक्षकमित्र युवक-युवती एखाद्या झाडाखाली, स्वत:च्या घरात वा समाजमंदिरात वर्ग भरवितात. कोरोना कालावधीत चिमुकली शिक्षणापासून वंचित नसल्याने पालक समाधानी आहेत. तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येगडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणााधिकारी सिद्धेश्वर काळूसे, संदीप बोडके यांचे मार्गदर्शन उपक्रमाला लाभत आहे.मेळघाटच्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गावातीलच शिक्षित युवक-युवतींमधून शिक्षकमित्र तयार करण्यात आले. स्वत:च्या घरात, झाडाखाली, समाजमंदिरात प्रत्येक चार ते पाच विद्यार्थ्यांना ते दहावीपर्यंत धडे देत आहेत.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी
चिखलदऱ्यात शाळा बंद; ऑफलाईन शिक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 5:00 AM
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या आदिवासी भागात बोंब आहे. त्यामुळे जेथे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, तेथे शिक्षकमित्र सरसावले आहेत.
ठळक मुद्देयुवा पिढीकडून अध्यापन; झाडाखाली, घरात, समाजमंदिरात चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे