शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM

अमरावती : सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शालेय कामकाज सुरू झाले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची ...

अमरावती : सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शालेय कामकाज सुरू झाले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात शाळेत उपस्थिती नाही. परंतु, विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी नियोजनपूर्वक कार्यवाही सर्व शाळांनी करणे आवश्यक आहे. याकरिता ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम यावर्षीसुद्धा सुरू ठेवावा. त्याबाबतचे योग्य ते नियोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी करावे, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांमध्ये अँड्रॉईड मोबाईल सुविधा उपलब्ध असलेली व नसलेली विद्यार्थिसंख्या निश्चित करावी. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दैनंदिन ऑनलाईन तासिका शिक्षकांनी घेण्याचे नियोजन करून प्रत्यक्ष तासिका घेण्यात याव्यात. व्हॉट्सॲप, दीक्षा ॲप, दूरदर्शन, रेडिओवर प्रसारित होणारे शैक्षणिक कार्यक्रम, अभ्यासमाला याद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील, या दृष्टीने कार्यवाही करावी. ऑनलाईन शिक्षणाबाबत शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. मागील सत्रातील ‘शिक्षक मित्र’ उपक्रम या सत्रातसुद्धा सुरू ठेवण्यात यावा. यासंदर्भात ऑफलाईन शिक्षणासाठी गावातील उच्चशिक्षित व्यक्ती, पालक यांना प्रवृत्त करून शिक्षक मित्र म्हणून त्यांच्याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांचे गावातील योग्य ठिकाणी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शिक्षण सुरू ठेवण्यात यावे. स्वत: शिक्षकांनीसुद्धा शिक्षक मित्र म्हणून काम करावे. याव्यतिरिक्त शिक्षकांना नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना दिल्या आहेत.

कोट

शाळेतील शिक्षणाचे कार्यक्रम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक व सर्व पर्यवेक्षकांनी नियोजन करून अंमलबजावणी करावी. कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पर्यवेक्षीय यंत्रणेने योग्य ते संनियत्रण करावे व शिक्षक मित्रांची संख्या या कार्यालयास सादर करावी.

ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)