अमरावती : राज्य शासनाने कोरोना संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात १४४ कलम संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य शासन व जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या. शिक्षकांना वर्क फ्राॅर्म होम पद्धतीने शैक्षणिक कामे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीचे आदेश १५ एप्रिलच्या पत्रानुसार दिले होते. सदर आदेश रद्द करून शिक्षकांना संचारबंदी काळात शाळेत उपस्थित न राहण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे शिक्षक समितीने सीईओ व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. अशातच कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासन व जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद आहे. ठेवण्याचे याव्यात तसेच संबंधित शिक्षकांनी शासन निर्णयानुसार ऑनलाईन अध्यापन, स्वाध्याय उपक्रम, सुधारित निकषाप्रमाणे मूल्यमापन प्रक्रिया वर्क फ्राॅर्म होम पद्धतीने करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांध्यामार्फत शाळा व शिक्षकांना दिले आहेत.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासन व जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सीईओंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून शिक्षकांनी वर्क फ्राॅर्म होमचे आदेश ३० एप्रिलपर्यंत दिले आहेत.
- ई.झेड खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक