असाईनमेंट पान २ चे लिड
अमरावती : कोरोनाच्या अनुषंगाने गतवर्षीपासून शाळांचे वर्ग ऑनलाईन घेतले जात आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांना आपल्या पाल्यांना नवीन अँड्राईड मोबाईल घेऊन द्यावे लागले. ऑनलाईन वर्गासाठी सर्वच शाळांनी ॲपचा वापर चालवला. मात्र, काही फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी वाढली आहे. अलीकडे ऑनलाईन वर्गात नको ते मेसेज व्हायरल होण्याचे प्रकार उघड झाले आहेत. अमरावती शहर वा जिल्ह्यात असे प्रकार घडले नसले, तरी ऑनलाईन वर्गांनंतर पाल्य मोबाईल सोडत नसल्याने ते नेमके काय पाहतात, याकडे पालकांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे.
/////////
शाळांनी ही घ्यावी काळजी
एखादा शिक्षक जर ऑनलाईन वर्ग घेत असेल, तर त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाईन वर्गात कुणी घुसखोरी तर करत नाही ना, याची खात्री करावी. शिक्षकांनी पाठविलेली लिंक विद्यार्थ्यांनी इतरांना पाठवू नये, याची जाणीव शाळांनी त्यांना करून देणेदेखील अगत्याचे आहे.
////////
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
आपला पाल्य ऑनलाईन वर्गादरम्यान वा नंतर काय पाहतो, याकडे पालकांनी डोळसपणे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. मुले लपून छपून काही वावगे तर पाहात नाहीत ना, हे पाहणेदेखील आत्यंतिक गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देणे टाळा.
///////////////
असेही घडू शकते
ऑनलाईन वर्गादरम्यान नको ते मेसेज व्हायरल होण्याचा प्रकार शहर तथा जिल्ह्यात कुठेही घडलेला नाही. सायबर पोलिसांकडे तशी नोंददेखील नाही. मात्र, एखाद्या वेबसाईट वा पोर्टलवरील नको त्या व्हिडिओला लाईक केल्यास मोबाईल स्क्रिनवर तो व्हिडिओचा छोटासा शॉट झळकू शकतो. ते पाल्यांसमोर उघड होण्याची भीती संभवते.
///////
सायबर सेल कोट
ऑनलाईन क्लासेससाठी गुगल क्लासरूम, गुगल मिट व झूमसारखी अप्लिकेशन वापरली जात आहेत. ती ॲप लॉगीन व पासवर्डशिवाय उघडत नाही. ऑनलाईन क्लासला कोणकोण विद्यार्थी ज्वाईन झाले आहेत, ते शिक्षकांना ज्ञात असते. अमरावती शहरात असा कुठलाही प्रकार घडलेला नाही.
सीमा दाताळकर,
पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे