शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:12 PM

प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने .....

ठळक मुद्देसहनशक्ती संपली : चांदूर रेल्वे बस आगाराचा कारभार नियोजनशून्य

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने याच बसमधून प्रवास करू द्यावा, नसल्यास दुसºया बसची व्यवस्था करावी. मात्र, तोपर्यंत आम्ही ही बस पुढे जाऊ देणार नाही, असे या बालप्रवाशांनी ठणकावून सांगितले. मुलांच्या या पवित्र्यामुळे चांदूरहून दुसरी बस सोडावी लागली. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या कुºह्याच्या ठाणेदारांना बालकांनी या रोजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.तिवस्याहून चांदूर रेल्वेकरिता कुºहामार्गे पहिली बस पंक्चर झाल्याने त्यानंतरच्या तिवसा-चांदूर रेल्वे बसवर बरीच गर्दी होती. सकाळी १०.३० वाजता कुºहा येथून सुमारे ७० प्रवासी चढले. वाढोणा थांब्यावर आमला, चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी जाणारे २५ ते ३० विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. जागा नसल्याचे पाहून चालक-वाहकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्वरेने बसपुढे येत ती अडवून धरली व रस्त्यावर झोपले. जोपर्यंत आम्हाला घेत नाही किंवा दुसरी बस येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बसमधील प्रवाशांनीही त्यांचे समर्थन केले. ही बाब चालक-वाहकांनी चांदूर आगाराला कळविली. त्यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलीस पथक उपनिरीक्षक प्रणीत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचले. पंचायत समिती सदस्य मंगेश भगोलेदेखील यावेळी पोहोचले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांची रास्त मागणी प्रवाशांनी उचलून धरल्यामुळे चांदूर आगाराहून दुसरी पाठवून हा गुंता सोडविण्यात आला.कुºहा पोलिसांनी वाढोणा बस थांबा गाठला आणि विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. दुसरी बसच्या प्रतीक्षेत मुलांना शाळेत उशीर झाला असता. त्यातच काही मुलांचे पेपर होते. यामुळे पीएसआय प्रणीत पाटील यांनी पोलीस जीपने मुलांना आमला येथे पोहचविले आणि त्यांची गैरसोय टाळली. याबद्दल विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.कुºह्याहून बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची दाटी झाली, की पुढच्या स्टॉपवर बस थांबवली जात नाही. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची गर्र्दी पुढच्या बसची वाट पाहत राहते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, चांदूर आगाराने शाळेच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी.- अर्चना तिरमारे, शिक्षिकानेहमीच मुले बसच्या प्रतीक्षेत आढळून येतात. या मार्गावर धावणाºया चांदूर आगाराच्या बस एक तर वाईट अवस्थेला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे बसफेºयांसाठी वेळेचे नियोजन पाळले जात नाही. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांकडे आगार व्यवस्थापकाची तक्रार करणार आहे.- मंगेश भगोले, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :Schoolशाळा