संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात शेकडो स्कूल व्हॅन व बसेस रस्त्यावरून धावणार आहे. यामधूनच रोज हजारो विद्यार्थी शाळेत जातात. त्यामुळे अशा नियमबाह्य धावणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करणे अपेक्षित आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात आरटीओकडून स्कूल व्हॅनची फेरतपासणी व व्हॅनचे फिटनेस करून घेणे अनिवार्य आहे. स्कूल व्हॅनची फेरतपासणी करून घेतली आहे का? स्कूलबसचा स्पिड नियमानुसार बांधला आहे काय, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. २०११ च्या स्कूल व्हॅन नियमावलीनुसार फिटनेस व न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी फेरतपासणी करून घेणे गरजेचे आहे. जर स्कूल बसला आग लागल्यास आपत्कालीन व्यवस्था आहे का? अनेक फेरतपासणीशिवाय वाहने धावणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगतीला लागला आहे. धावत्या स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांनी खिडकीतून डोकावून पाहू नये, खिडकीच्या मधात चारही बाजूला रॉड असणे आवश्यक्ता आहे. वाहन चालविताना ४० च्यावर स्पिडने वाहन चालवू नये, स्कूल व्हॅन किंवा बसमध्ये आग लागल्यास सुरक्षितता म्हणून ते विझविण्यासाठी अग्निरोधक यंत्रे असणे अनिवार्य आहे. जेवढे प्रादेशिक परिवहन विभागाचे पासिंग आहे. तेवढीच विद्यार्थी संख्या चालकाने शाळेत नेणे आवश्यक आहे.वाहनामध्ये आरटीओने स्पिड गर्वनल बसविले असल्याने आरटीओला स्पिड कळते.पाच लाखांवर विद्यार्थी घेतात शिक्षणमाध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये १ ते १२ पर्यंत अंदाजे ५ लाख २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती शिक्षणाधिकाºयाच्यावतीने प्राप्त झाली आहे. यामध्ये माध्यमिकच्या ६१८ शाळांमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिकच्या १६०० शाळांमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हजारो विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. त्यामुळे नियमात वागणे गरजेचे आहे.जिल्ह्यात ६५० स्कूल व्हॅन व बसेसअमरावती जिल्ह्यामध्ये आरटीओकडून परवाना घेतलेल्या ६५० स्कूल व्हॅन व बस आहेत. मात्र, यापैक ी अनेक बसच्या चालकांनी यंदा स्कूल व्हॅनची फेरतपासणी करून घेतली नाही. त्यामुळे कारवाई अपेक्षित आहे.आॅटोचालकांना नियम नाहीत का?आॅटोमध्ये विद्यार्थी प्रवासासाठी परवानगी दिली जात नाही. आॅटोला ३-१ चे पासिंग असले तरी पाच लहान मुलांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून नेतात. हा प्रकार नियमबाह्य आहे. त्यामुळे थोडेअधिक पैसे कमाविण्यासाठी आॅटोचालक असले धाडस करतात. त्यामुळे त्यांना नियमावली नाही का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
स्कूल व्हॅन धावतात फेरतपासणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:35 PM
आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देआरटीओची कारवाई केव्हा? : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात