लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमधीलडिजिटल साहित्य तपासणीचे काम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने हाती घेतले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये कोणत्या प्रकारची डिजिटल साधने उपलब्ध आहेत, याची यादी शिक्षण परिषदेने मागविली आहे.राज्यातील शाळांना डिजिटल स्वरूप देण्यासाठी राज्यात मागील काही वर्षांमध्ये शिक्षण विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विविध शाळांमध्ये निरनिराळ्या प्रकारची डिजिटल साधनेदेखील घेण्यात आली आहेत. यामध्ये कम्प्यूटर, एलसीडी टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप यांचा समावेश आहे. शाळांमध्ये डिजिटल साधनांची खरेदी झाली असली तरी राज्यभरातील बहुतांश शाळांमध्ये ही माहिती उपलब्ध नाही, ही माहिती संकलित करण्याचे कामे प्राथमिक शिक्षण परिषदेने आता सुरू केली आहे. शाळांनी आपल्याकडील उपलब्ध डिजिटल साधनांची यादी द्यावी, यासाठी लिंक विकसित करण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये उपलब्ध शैक्षणिक तंत्रज्ञान ई-आशय विद्युत सुविधा तंत्रस्नेही शिक्षक यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.या लिंकवर शाळांना भरावी लागणार माहितीशाळांनाही माहिती देण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यानंतर पुढील काळात शाळांना कोणते डिजिटल तंत्रज्ञान द्यावयाची, यावर निर्णय घेतला जाईल. लिंकवरील माहितीचा आढावा घेऊन कोणते शैक्षणिक तंत्रज्ञान किंवा डिजिटल साहित्याचे नियोजन राज्यस्तरावर केले जाईल, याआधारे पुढील वर्षात पत्र तयार करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठविले जातील.तांत्रिक साहाय्य पुरविण्याची सूचनाशाळांना लिंकवर ही माहिती भरता यावी, आवश्यक ते तांत्रिक सहाय्यदेखील पुरविण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने समग्र शिक्षा अभियानामधील कम्प्यूटर प्रोग्रामर, एमआयएस समन्वयक, डाटा एंट्री आॅपरेटर यांना दिल्या आहेत. सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश परिषदेने शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनाही दिले आहेत.
शाळांना द्यावी लागेल डिजिटल माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:05 AM
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील डिजिटल साहित्य तपासणीचे काम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने हाती घेतले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये कोणत्या प्रकारची डिजिटल साधने उपलब्ध आहेत, याची यादी शिक्षण परिषदेने मागविली आहे.
ठळक मुद्देउपलब्ध डिजिटल साहित्याची यादी मागविली : प्रोजेक्टर, एलसीडी, लॅपटॉपचा समावेश