संदीप मानकरअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादानिमित्त जमलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी दुसºया दिवशी मेळघाटच्या जंगलाची सफारी केली आणि कोळ्यांच्या विविध प्रजातींची ओळख करून घेतली.बोरी (हरिसाल) येथे मुठवा समुदाय संशोधन केंद्रात आयोजित ह्यसायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडियाह्ण असा या परिसंवादाला ८० शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवून आपले शोधप्रबंधही सादर केले. निसर्गरम्य मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता, २१ व्या शतकातील जैवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापन व त्याचे आजच्या काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञ व वन्यजीव अभ्यासकांचे मार्गदर्शन कार्यशाळेत लाभत आहे. भारतीय वन्यजीव संशोधन संस्थान (डेहराडून), सातपुडा फाऊंडेशन, राजर्षी शाहू महाविद्यालय (चांदूर रेल्वे), महात्मा फुले महाविद्यालय (वरूड) व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय (अमरावती) यांनी आआयोजनात योगदान दिले आहे.कोळी (स्पायडर) अभ्यासक अतुल बोडखे यांनी दुसºया दिवशी सोमवारी विविध प्रजातींचा अभ्यास सादर केला. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कौषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य रामेश्वर भिसे आदींनी यावेळी परिसंवादाला भेटी दिल्या. त्यापूर्वी पहाटे विस्थापित कुंड गावात निर्माण झालेल्या जंगलात देशविदेशातून आलेल्या ८० शास्त्रज्ञांनी मेळघाटातील विविध वन्यजिवांचा यावेळी अभ्यास केला. यामध्ये शास्त्रज्ञ वीरेंद्र प्रसाद, सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बॉयलॉजी (हैद्राबाद) चे शास्त्रज्ञ सुनीलकुमार वर्मा, शास्त्रज्ञ साजिया काफीन यांच्यासह महेश चिखले, गजानन संतापे, सुभाष कांबळे यांचीही उपस्थिती होती. यावेळी अतुल बोडखे यांनी मेळघाटात आढळणाºया कोळींच्या प्रजातीची देशभरातून आलेले शास्त्रज्ञ व अभ्यासक विद्यार्थ्यांना माहिती दिली. महाराष्ट्र वाइल्ड लाइफ वॉर्डन ए.के. मिश्रा यांनी जैवविविधता व वन्यजींवर विद्यार्थ्यांना व उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.
देश-विदेशातील शास्त्रज्ञांनी केली मेळघाटची सफर, स्पायडरवर कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:07 PM