लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटाने बुधवारी रात्री पुन्हा तीन बकºया ठार केल्या व एक जखमी केली. पुन्हा काल रात्री शेळी व मेंढी फार्मच्या शेड क्र. २ मध्ये ५ फूट उंचीचे ताराच्या कुंपणावरून छलांग मारून आत घुसला. एका बकरीला ठार केले.या बिबटने आतापर्यंत एका आठवडाभरात बकºयांवर धुमाकूळ घातला असल्याने सलग एकाच जागी दोन दिवस बिबटने एकाच शेडमधील बकºया जागीच ठार केल्या. विशेष म्हणजे मंगळवारी रात्री तीन बकºया ठार केल्यानंतर पुन्हा बिबट्याने त्याच शेडमध्ये येऊन त्या शेडमधील एक बकरी ठार केली. या शेळी व मेंढी फार्मच्या कर्मचाºयांमध्ये दहशत निर्माण झाल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, पोहºयाचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे, वनरक्षक डी.ओ. चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून पुन्हा पाहणी करून शेळी व मेंढी फार्मच्या परिसर पिंजून काढून बिबट्याच्या पाऊलखुणाचा मागवा घेवून कोणत्या दिशेने येवून शेडमध्ये शिरला याची देखील पाहणी करून मृत्यू बकरीचे शवविच्छेदन करून वन कर्मचाºयांनी पंचनामा केला व बकरीचा दफनविधी केले. शेळी व मेंढी फार्मचे मॅनेजर बी. एन. कंधारे, आर. एम. कुलकर्णी, आर. एम. पाटील यांच्याशी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सतर्कता बाळगण्याचे सूचना दिल्या.बिबटाला झुडुपांचा आश्रयजंगलाशेजारी असलेल्या शेळी व मेंढी फार्मच्या परिसरात शेळ्यांना चाºयासाठी मक्याची लागवड करण्यात आली आहे. बिबट्याला झाडाझुडुपात दडपून बसण्याकरिता जागा असल्याने तो त्याच परिसरात ठाण मांडून असल्याचे बोलले जाते. येथे पुन्हा त्याच शेडमधील बकरी फस्त केल्याने बिबटचा पुन्हा डोळा त्याच शेडकडे असल्याचे निदर्शनास येत आहे.
बिबट्याचा धुमाकूळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 1:41 AM
महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटाने बुधवारी रात्री पुन्हा तीन बकºया ठार केल्या व एक जखमी केली. पुन्हा काल रात्री शेळी व मेंढी फार्मच्या शेड क्र. २ मध्ये ५ फूट उंचीचे ताराच्या कुंपणावरून छलांग मारून आत घुसला.
ठळक मुद्देशेळी व मेंढी फार्ममध्ये पुन्हा केली बिबट्याने बकरी फस्त