नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मेळघाटात परतवाडा आगारातर्फे वारंवार भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या पाठविण्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, त्याही आता अनिमित वेळेत किंवा मनात येईल तेव्हा पाठविल्या जात असल्याने आदिवासी प्रवाशांची परवड सुरू आहे. परतवाडा आगारातून टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणी पाठविण्यात येणारी सकाळी ८:३० वाजताची बस फेरी मनात येईल तेव्हा आगाराच्या मनमानी कारभाराने पाठविण्यात येत आहे. अनियमित धावणाºया या बसफेरीचा फटका तालुक्यातील धारणी येथे उपविभागीय कार्यालयासह आदिवासी प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त जाणाºया गोरगरीब आदिवासींना बसत आहे. दिवसभर ताटकळत बसूनही एसटी येत नसल्याने निराश मनाने पुन्हा दुसºया दिवशी परतवाडा येऊन धारणी जावे लागत असल्याने आर्थिक फटका व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.परतवाडा आगाराची टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणीपर्यंत धावणारी ही बस फेरी ३० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांना जोडणारी आहे. परसापूर, उपातखेडा, बोराळा, गाडसिम्बा, नागापूर, गौलखेडा बाजार, वडापाटी, तेलखार, धरमडोह, बहाद्दरपूर, चांदपूर, टेम्ब्रुसोंडा, वस्तापूर, कुलंगणा, चिंचखेडा, जामली आर, अंबापाटी, खोंगडा, गिरगुटी, ढाकणा, सावºया, बैराटेकी, बोरीखेडा, गडगामालूर, बिजुधावडी या गावांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यावरील गावांच्या आदिवासींना ही बसफेरी काम आटपून परत येण्यासाठी योग्य आहे. असे असताना महामंडळाचा हेकेखोरपणा आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारा ठरला आहे.धारणी व चिखलदरा तालुक्यात एकूण ३०१ गावे आहेत. त्यातील १५० पेक्षा अधिक गावे अतिशय दुर्गम क्षेत्रात आहेत. ती अद्यापही एसटी किंवा दळवळणाच्या अन्य साधनांनी जोडली गेली नाहीत. आदिवासी बांधव एसटी बस नियमित यावी, यासाठी झगडत असतात. मात्र, प्रशासन त्यांना भाव देत नाही. एका गावातील प्रवासी घेण्यासाठी दुर्गम भागात एसटी न्यायला परवडत नाही, अशी सबब महामंडळाकडून दिली जाते. मात्र, ज्या बसफेºया सुरू आहेत, प्रवासी गाड्या आहेत, त्याही अनियमित असल्याने आदिवासी बांधवांची मोठी कुचंबना होत आहे.स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही मेळघाटातील अनेक गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये एसटी पोहोचलेली नाही आणि जेथे पोहोचली, तेथे ती नियमितपणे पाठविली जात नाही. त्याचा दुष्परिणाम आदिवासी रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. एसटी नसल्याने आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. आजही रुग्णांना परतवाडा व अचलपूर शहरात उपचारासाठी यावे लागते, ही मेळघाटची शोकांतिका आहे.परतवाडा-टेम्ब्रुसोंडा धारणी या मार्गावर धावणारी बसफेरी महामंडळाच्या हेकेखोरपणामुळे मनात येईल तेव्हा पाठविली जाते. त्याचा आदिवासींनाच फटका बसत आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसचे संभुजी खडके यांनी दिला आहे.
मेळघाटात भंगार एसटी; त्याही अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:04 PM
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ठळक मुद्देआदिवासींमध्ये संताप : आंदोलनाचा इशारा, दळणवळणाची साधने मर्यादित