आॅनलाईन लोकमतअमरावती : जनता कृषी विद्यालयातील एका विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणे तेथील लिपिकाला चांगलेच महागात पडले. संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी या लिपिकाची मंगळवारी विद्यालय ते पोलीस ठाणे अशी धिंड काढली. त्याच्या गळ्यात जोडे-चपलांचा हार घालत त्याला बदडण्यात आल तसेच त्याच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले.मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जनता कृषी विद्यालयानजीक हा प्रकार घडला. बाबूलाल इंगळे (३६, रा. पळसो बढे) असे आरोपी लिपिकाचे नाव असून, त्याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार, मूळची मेळघाटची रहिवासी असलेली ती विद्यार्थिनी मोर्शी रस्त्यावरील जनता कृषी विद्यालयात कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसºया वर्षाला आहे, तर आरोपी बाबुलाल इंगळे याच विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.युवा स्वाभिमानीकडूनही चोपपरीक्षेचा अर्ज भरण्याची व परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची बतावणी करीत आरोपी बाबूलालने रविवारी दुपारी या मुलीला जनता विद्यालयातीलच एका खोलीत बोलावले व तेथे तिला शरीरसुखाची मागणी केली. त्या खोलीत अगोदरच उपस्थित असलेल्या बांबल नामक चपराशाला बाबूलालने पैसे देऊन तेथून पिटाळले. या विद्यार्थिनीने बाबूलालला स्पष्ट नकार देत त्याच्या तावडीतून कसाबसा पळ काढला. हा प्रकार तिने मैत्रिणीच्या कानावर घातला. तिच्या मैत्रिणीनेच हा वृत्तांत पीडित मुलीच्या नातेवाइकांना सांगितला. त्यानुसार या मुलीचे ५० पेक्षा अधिक नातेवाईक मंगळवारी जनता कृषी विद्यालयात पोहोचले. विद्यालयात पोहोचताच त्याला त्या नातेवाइकांनी बाबूलाल इंगळेला घेरले व बेदम चोप दिला. त्याची जनता कृषी विद्यालय परिसरातून गाडगेनगर पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली व त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही चोप दिला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संबंधित मुलीच्या तक्रारीवरून बाबूलाल इंगळे, सुनील विल्हेकर व बांबल नामक चपराशाविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. बाबुलाल इंगळेला अटक केली आहे. नागरिक व नातेवकांच्या संतापाला बळी पडलेल्या बाबूलाल इंगळेला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. सुमारे एक तास जनता कृषी विद्यालय ते गाडगेनगर पोलीस ठाणे हा हायव्होल्टेज ड्रामा चालला.सुपरवायझरकडून छेडयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुनील विल्हेकर नामक सुपरवायझरने यापूर्वी सदर विद्यार्थिनीची छेड काढली, तर पैसे घेऊन बांबल नामक शिपायाने बाबूलाल इंगळेला संबंधितची छेड काढण्यास मदत केली. संबंधित विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीत हा संपूर्ण घटनाक्रम नमूद आहे.जनता कृषी विद्यालयातील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्यां बाबूलाल इंगळे यास अटक केली. त्याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाबूलालला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.- मनीष ठाकरेठाणेदार, गाडगेनगर
संतप्त नातेवाईकांनी काढली लिपिकाची धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:15 AM
जनता कृषी विद्यालयातील एका विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणे तेथील लिपिकाला चांगलेच महागात पडले.
ठळक मुद्देविद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी : जनता कृषी विद्यालयातील प्रकार, लिपिकासह तिघांविरुद्ध गुन्हे