लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नवरात्री उत्सवाला १७ ऑक्टोबरपासून सुरू होत असली तरी बाजारात शांतता आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांपासून तर दुकानदारांपर्यंत सर्वांची उलाढाल ठप्प आहे. कोरोना संक्रमणामुळे शासनाने नियम लादल्याने केवळ चार फूट उंचीपर्यंतच मूर्ती स्थापण्याचे आदेश आहेत. ध्वनिक्षेपक, डेकोरेशनलासुद्धा परवानगी नाही. सांस्कृतिक सोहळ्यांना बंदी असल्याने भाविक, तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे मूर्तिकार, डेकोरेशन व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला आहे. दुर्गोत्सव लॉकडाऊनच राहणार असल्याने मूर्तिकार केवळ ऑर्डरनुसारच मूर्ती तयार करीत आहेत.गत मार्चपासून कोरोनाच्या सावटाखाली जीवन व्यतीत करताना सर्वसामान्यांना आता आर्थिक स्तरावर यातना व्हायला लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये तीन महिने व्यवसाय कुलूपबंद होता. ‘मिशन बिगेन अगेन’मध्ये सर्व व्यवसाय सुरू झाले असले तरी उत्सव, सणांचे आयोजन बंदच आहे. देवालये कुलूपबंद आहेत. यामुळे हार-फुले, डेकोरेशन, मंडप, मूर्तिकार, बँड-पार्टी, ताशे, ढोलकी, डीजे व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे. वाजंत्री, सजावट, ध्वनिक्षेपावर बंदी कायम असल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ आली.नवरात्रौत्सव १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, भाविकांसह नागरिकांमध्ये निरुत्साह आहे. मूर्तींच्या रूपसज्जेचा अंतिम टप्पा गाठणाºया मूर्तिकारांनाही सार्वजनिक उत्सव नसल्याने फटका बसला आहे.डेकोरेशन व्यावसायिकांनी व्यवसायासाठी आणलेल्या नव्याकोºया साहित्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न पडला आहे. सजावटीवर बंदी नसली तरी अधिकारी त्याकरिता परवानगी देत नाहीत. मूर्तीसुद्धा चार फूट उंच असावी, असे शासनाने आदेश आहेत. कोरोनाने सर्वसामान्यांचे खच्चीकरण केल्याने लहान व्यावसायिक हवालदिल झाले आहे. नवरात्री उत्सवापूर्वीची रेलचेल हद्दपार झाली आहे. देवाचे दर्शन दुर्लभ झाले असले तरी मद्याचे दर्शन सुलभ आहे. हे लक्षात घेऊन शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी भाविकांची आहे.शासनाने मंदिरे उघडावी, मदिरालये नाहीकोरोनाच्या नावावर बेबंदशाही सुरू आहे . मंदिरे कुलूपबंद; देशी-विदेशी दारूची दुकाने उघडी, असा उफराटा न्याय आहे . मंदिरे बंद असल्याने भाविकांची कुचंबणा होत आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. भजन-कीर्तन करणाºया मंडळींवर उपासमारी आली आहे. उत्सव होत नसल्याने बेरोजगारीचे जिणे जगावे लागत आहे. शासनाने दारूची दुकाने (मदिरालये) बार बंद करून मंदिरे उघडी करावी, सकाळी भूपाळी, आरत्यांचे सूर ऐकू द्यावे, असे आवाहन करजगाव (गांधीघर) येथील राष्ट्रीय कीर्तनकार मोहनदास लांडगे यांनी केले.
मूर्तिकला, डेकोरेशन ‘लॉकडाऊन’च'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:00 AM
सांस्कृतिक सोहळ्यांना बंदी असल्याने भाविक, तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे मूर्तिकार, डेकोरेशन व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला आहे. दुर्गोत्सव लॉकडाऊनच राहणार असल्याने मूर्तिकार केवळ ऑर्डरनुसारच मूर्ती तयार करीत आहेत.
ठळक मुद्देनवरात्रोत्सव, दुर्गोत्सव कोरोनाच्या सावटात : डेकोरेशन व्यावसायिकांना लाखोंचा फटका