तिवसा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले बार नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने मंगळवारी रात्री ९ वाजता दरम्यान दंडात्मक कारवाई करून त्याला सील लावण्यात आले.
संचारबंदी नियमांतर्गत शहरातील देशी दुकाने, बार, हॉटेल यांना रात्री आठपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले बार हॉटेल या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रात्री महामार्गावर असलेला आशीर्वाद बार सीलबंद करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई तिवसा तहसीलदार वैभव फरतारे व पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी संयुक्तपणे करण्यात आली.