(फक्त सीडीसाठी)
फोटो - २७एएमपीएच२३
कॅप्शन - दीपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानाची पाहणी करताना प्रज्ञा सरवदे व अधिकारी.
दीपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी २३ मिनिटे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले
परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी हरिसाल येथे मंगळवारी प्रत्यक्ष भेट दिली. दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून ज्या शासकीय निवासस्थानात आत्महत्या केली, तेथे पाहणी केली. त्या निवासस्थानातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेल्या. सरवदे यांनी तेथे २३ मिनिटे थांबून निरीक्षण नोंदविले.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा गंभीर आरोप झाले. त्यांच्या चौकशीसाठी मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे या २७ एप्रिल रोजी हरिसाल येथे पोहोचल्या. त्यांनी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते वनाधिकारी व कर्मचारी यांचे नोंदविलेले बयाण त्यावर प्रत्यक्ष बोलून पडताळणी केली. हरिसाल येथे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, धारणीचे ठाणेदार कुलकर्णी उपस्थित होते.
-------------------
दीपाली यांची पर्स आणि २३ मिनिटे
दीपाली चव्हाण हरिसाल येथे ज्या शासकीय निवासस्थानात राहत होत्या. त्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ११.३३ वाजता अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी भेट दिली. शासकीय निवासस्थानातील सर्व खोल्या त्यांनी बघितल्या. दीपाली यांनी जेथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, त्या ठिकाणाचे बारीकसारीक निरीक्षण नोंदविले. तेथे पडलेली दीपाली यांची पर्स उघडून त्यांनी पाहिली. काही कागदपत्रे होती, त्याचीही तपासणी केली. उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कुलूप उघडायला लावून त्या खोलीची पाहणी केली. ११.५६ च्या सुमारास त्या बाहेर पडल्या.
००००००००००००००००००००००
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाच तास बयाण
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांच्या चौकशीसाठी आलेल्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मंगळवारी धारणी तालुक्यातील हरिसाल येथे तब्बल पाच तास वन अधिकारी-कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत केली. यादरम्यान ज्यांचा बयाण घ्यायचा आहे ते आणि आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याशिवाय कुणालाच आत प्रवेश नव्हता.
-------------------
बॉक्स
‘वन बाय वन एन्ट्री’
हरिसाल येथील निसर्ग निर्वचन संकुलात मंगळवारी अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी मुंबई वरून आलेल्या अधिकाऱ्यांनाही सोबत न घेता स्वतः वन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी एकांतात चर्चा केली. एपीसीसीएफवरील आरोपांची चौकशी असल्याने त्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या बयाणांसंदर्भात खातरजमा केली. व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी किंवा इतर कुणालाच यादरम्यान एन्ट्री मिळाली नाही.
--------
बॉक्स
१५ कर्मचारी, सहा अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले
मंगळवारी गुगामल वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक राजकुमार पटवारी, चिखलदरा आरएफओ मयूर भैलुमे, ढाकणा आरएफओ हिरालाल चौधरी, तारुबांदाचे आरएफओ सुहास मोरे, फिरते पथक तथा हरिसालचे प्रभारी आरएफओ पी.एम. ठाकरे या अधिकाऱ्यांसह १५ पेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे पूर्वी नोंदविलेल्या बयाणाची सरवदे यांनी पडताळणी केली.
------------------
बॉक्स
दीपाली यांच्या पतीची सहा तास चौकशी
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत गठित चौकशी पथकाने रविवारी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचा बयाण नोंदविण्यास तब्बल सहा तास घेतले. सायंकाळी ४.३० ते रात्री १०.३० या दरम्यान विविध मुद्द्यांवर प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती जाणून घेतली. मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात या चमूने दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणाशी कागदपत्रे गोळा केली.
----------------
प्रज्ञा सरवदे यांच्याकडून क्रॉस चेकिंग
अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे या सोमवारी सायंकाळी अमरावती येथे पोहोचल्या होत्या. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भेट घेऊन धारणी पोलिसांच्या तपासाबाबत सरवदे यांनी बारकावे जाणून घेतले. त्यानंतर दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी चौकशी पथकाकडे नोंदविलेल्या बयाणाचे आयपीएस सरवदे यांनी क्रॉस चेकिंग केले.
-----------