लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा मुक्त संचार आहे. वनविभाग आणि विद्यापीठ सुरक्षा विभागाच्या चमूने मंगळवारी त्याच्या संचार मार्गाचे सर्चिंग केले. बिबट्याच्या संचारमार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बिबट्यासंदर्भात सुरक्षेबाबत त्वरेने सूत्रे हलली.ना. मुनगंटीवार हे सोमवारी अमरावतीत विभागीय अर्थसंकल्पीय नियोजन आढावा बैठकीसाठी आले असता, विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार रोखण्याविषयी त्यांना नागरिकांनी निवेदन सादर केले. त्याअनुषंगाने ना. मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर हे फौजफाट्यासह विद्यापीठात दाखल झाले.विद्यापीठाचे सहायक कुलसचिव (सुरक्षा विभाग) रवींद्र सयाम, लांडगे यांच्या सहकार्याने बिबट्याचे संचार मार्ग, दडून बसण्याचे ठिकाण तसेच मुलींच्या वसतिगृह परिसराची वन विभागाने बारकाईने पाहणी केली. यानंतर पहिल्या टप्प्यात बिबट्याच्या संचार मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी वनविभागाचे एस.डी. टिकले, बाबूराव येवले, ओंकार भुरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.बिबट जेरबंदसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन बैठकीत विद्यापीठ परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराचा विषय काढल्यानंतर वनाधिकारी कामाला लागले. येथे दोन बिबट्यांचा संचार असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्याने निदर्शनास आले आहे. हे दोन्ही बिबट सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी सहायक वनसंरक्षकांकडून प्रस्ताव मागविला जाईल. त्यानंतर वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याला धक्का न लागता हे बिबट जेरबंद केले जातील, असे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी सांगितले.कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुलींच्या वसतिगृह परिसरात बिबट्याने कुत्र्याची शिकार केली.- रवींद्र सयामसहायक कुलसचिव
विद्यापीठात बिबट्याच्या संचार मार्गाचे सर्चिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:40 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा मुक्त संचार आहे. वनविभाग आणि विद्यापीठ सुरक्षा विभागाच्या चमूने मंगळवारी त्याच्या संचार मार्गाचे सर्चिंग केले. बिबट्याच्या संचारमार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बिबट्यासंदर्भात सुरक्षेबाबत त्वरेने सूत्रे हलली.
ठळक मुद्देवनविभागाची चमू धडकली