गणेश देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निर्वस्त्र करून मुलींचा मासिक धर्म अर्थात ऋतुस्त्राव तपासण्यात आल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार येथील प्रसिद्ध शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत (विमवि) घडल्याचे पुरावे लोकमतला प्राप्त झाले आहेत.बीएससी द्वितीय वर्षाला शिकणाºया मुलींवर नियोजित पद्धतीने दहशत पसरवून ऋतुस्त्राव तपासणी करायला भाग पडल्याचा हा प्रकार एम.एम.च्या द्वितीय वर्षाला शिकणाºया पाच विद्यार्थिनींनी केला. २७ आॅगस्ट रोजी रात्री १२.३० ते ३ वाजेपर्यंत रॅगिंगचा हा अश्लील प्रकार मुलींच्या वसतिगृहात सुरू होता.या प्रकारानंतर बी.एस्सी.च्या मुलींमध्ये कमालीचा संताप उफाळून आला आहे. या मुलींनी विमविमच्या संचालकांकडे एम.ए.च्या सिनियर मुलींनी रॅगिंग घेतल्याची तक्रार नोंदविली आहे. विमविमच्या संचालकांनी पाच दिवसांनंतरही या गंभीर तक्रारीची दखल घेतलेली नाही. रॅगिंग घेण्याºया मुलींविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. उलटपक्षी तक्रारकर्त्या मुलींवर महाविद्यालय प्रशासनाकडून तक्रार बदलविण्यासाठी दबाव टाकला जात आहे. घडलेला प्रकार मुली-मुलींमधीलच असल्याने तक्रारीतील 'रॅगिंग' शब्द काढून टाकण्यात यावा, असा विचित्र आग्रह महाविद्यालय प्रशासनाकडून तक्रारकर्त्या मुलींना होतो आहे.एकाच दिवशी तीन वेळा रॅगिंगबीएससीच्या मुलींना निर्वस्त्र करुन ऋतुस्त्राव तपासण्यास भाग पाडण्यापूर्वी दोन वेळा दहशत निर्माण करण्यासाठी सिनिअर्सनी 'रॅगिंग' घेतली. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील मेस हॉलमध्ये रात्री ८.३० च्या सुमारास बीएससीच्या सर्व मुलींना बोलवून एम.ए.च्या सिनिअर मुलींनी अनेक नियम त्यांना सांगितले. त्यानंतर पुन्हा रात्री १०.३० च्या सुमारास आर्ट गॅलरीत बीएस्सीच्या मुलींची सभा सिनिअर मुलींनी बोलविली. सिनिअरशी कसे वागावे, यासंबंधिचे नियम ज्युनिअर्सना यावेळी सांगण्यात आले. मेसममध्ये सिनिअर मुली जेवण करीत असताना ज्युनिअर मुलींना जेवण करण्याचे धरिष्ट्य दाखवू नये, सिनिअर मुली वसतिगृहाच्या किंवा कॅम्पसच्या परिसरात उपस्थित असतील तर ज्युनिअर मुलींनी त्यांच्यासमोर फोनवर बोलू नये, असे या दोन्ही 'रॅगिंग' दरम्यान बजावण्यात आले. त्यांतर मध्यरात्री १२.३० च्या सुमारास होस्टेलमधील टॉयलेटनजीक बी.एससीच्या मुलींना त्या एम.ए.च्या मुलींनी बोलविले. टॉयलेटमध्ये व्रॅपर पडल्याचे ज्युनिअर मुलींना सांगून ज्या कुणाचे व्रॅपर असेल त्यांनी ते उचलून घ्यावे, असा हुकूम सोडण्यात आला. खरे तर तेथे व्रॅपर असल्याचे ज्युनिअर मुलींपैकी कुणीच बघितले नव्हते. उपस्थितांपैकी एकाही मुलीचे व्रॅपर नसल्याने कुणीच ते उचलले नाही. त्यानंतर संतापलेल्या सिनिअर मुलींनी कुणाकुणाला ऋतुस्त्राव सुरू आहे, असा सवाल केला. ऋतुस्त्राव सुरू असलेल्या मुलींनी एका बाजुला रांग लावावी, असा हुकूम सोडला. उपस्थित चाळीसेक मुलींपैकी ५ मुली त्या रांगेत घाबरत घाबरत उभ्या झाल्या. इतक्या कमी मुलींना ऋतुस्त्राव कसा, असा अजब प्रश्न सिनिअर मुलींनी ज्युनिअर मुलींना केला. आता सर्वांचा ऋतुस्त्राव तपासला जाईल, असा हुकूम पुन्हा सोडला गेला. हात धरून ज्युनिअर मुलींना ओढत ओढत खोलीत नेले गेले. सिनिअर मुलींच्या उपस्थितीत निर्वस्त्र करुन ज्युनिअर मुलींना स्वत:चा ऋतुस्त्राव स्वत:च्याच हाताने तपासण्याचे आदेश दिले गेले. अतिशय घाबरलेल्या मुलींनी त्या आदेशाचे पालन केले. हा प्रकार रात्री ३.०० वाजेपर्यंत सुरू होता. रॅगिंचा हा प्रकार सुरू असताना वॉर्डन तेथे उपस्थित नव्हत्या, हे येथे उल्लेखनीय. काही मुलींनी शिताफीने वॉर्डनशी संपर्क केला. रॅगिंग पूर्ण होत असल्यावर वॉर्डन तेथे पोहोचल्या. त्यावेळी रॅगिंग घेणाºया मुलींनी आम्ही केवळ सातच मुलींची तपासणी केली, असे उलट उत्तर वॉर्डनला दिले.डायरेक्टरकडे तक्राररॅगिंगच्या या सर्व धक्कादायक प्रकाराबाबत बीएससीमध्ये शिकणाºया मुलींनी विमविच्या संचालकांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर तब्बल ४३ मुलींच्या सह्या आहेत. रॅगिंग घेणाºया पाच मुलींची नावे, या तक्रारीत स्पष्टपणे लिहिलेली आहेत. तक्रारीमध्ये, ''आम्ही आपल्या संस्थेत मुलींच्या नवीन वसतिगृहात राहत असून वसतिगृहात घडत असलेल्या अश्लिल प्रकाराबाबत आपणास जागरूक करण्यासाठी सदर अर्ज सादर करीत आहोत. दि. २८.८.१७ रोजी रात्री १२ च्या सुमारास कला शाखेच्या सिनिअर्सकडून विज्ञान शाखेतील ज्युनिअर्सची कपडे काढून रॅगिंग करण्यात आली...'', असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. (क्रमश:)
निर्वस्त्र करून ऋतुस्त्राव तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:42 PM
गणेश देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निर्वस्त्र करून मुलींचा मासिक धर्म अर्थात ऋतुस्त्राव तपासण्यात आल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार येथील प्रसिद्ध शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत (विमवि) घडल्याचे पुरावे लोकमतला प्राप्त झाले आहेत.बीएससी द्वितीय वर्षाला शिकणाºया मुलींवर नियोजित पद्धतीने दहशत पसरवून ऋतुस्त्राव तपासणी करायला भाग पडल्याचा हा प्रकार एम.एम.च्या द्वितीय ...
ठळक मुद्देव्हीएमव्हीमधील धक्कादायक प्रकार : एमएच्या मुलींनी घेतली बीएस्सीच्या मुलींची रॅगिंग४३ मुलींच्या सह्यांची तक्रारप्रकरण दाबण्याचा विमविचा प्रयत्नमहाविद्यालयाकडून अद्यापही पोलीस तक्रार नाही