साधारणत: हिवाळा असो किंवा उन्हाळा या ऋतूमध्ये गाड्यांची विशेष काळजी घेण्याचे कारण नसते; परंतु पावसाळ्यामध्ये आपली गाडी बंद पडू नये यासाठी नागरिक आपली गाड्यांची काळजी घेत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. यावर्षी पावसाने मान्सूनपूर्व पावसाने एन्ट्री केल्याने अनेकांच्या गाड्यांमध्ये बिघाड आल्याचे चित्र दिसत होते. आता मात्र नागरिकांनी गाड्यांची काळजी घेत असल्याचे दिसते आहे.
काही दिवसा पहिले गाडीच्या खोळीसाठी शहरांमध्ये खरेदी करण्यासाठी जावे लागत होते आता मात्र प्रत्येक खेड्यापाड्यात फेरीवाले येत असल्याने सध्या तरी ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या मिटल्याचे नागरिक सांगत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपल्या जनावरांना पावसाळ्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी गोठ्यावरील मेनकापड किंवा प्लास्टिकचे कागद टाकून गळण्यापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे दिसते आहे. सोबतच ज्या सामान्य नागरिकांचे घरावरील कवेलू वानरांच्या धुमाकुळामुळे फुटल्या गेले, कवेलू मिळणे कठीण झाले, त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या घरावर प्लास्टिकचे कागद किंवा मेनकापड टाकून ते दुरुस्ती करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्लास्टिकच्या कागदाची व मेनकापडाची मागणी वाढल्याचे एका व्यावसायिकाने यावेळी सांगितले.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कागद किंवा मेनकापड तसेच गावामध्ये बाहेरगावावरून ताडपत्री विक्रीस येत असल्याने ते खरेदी करण्याचा सपाटा नागरिकांनी लावल्याचे दिसते आहे.
ताडपत्री ग्रामीण भागात व्यावसायिक घरपोच घेऊन येत असल्याने तसेच त्या विक्री त्याला सध्या चार-सहा महिने पैसे द्यावे लागत नसल्याने नागरिक ताडपत्रीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे ग्रामीण भागात दिसते आहे.