शासनाला निवेदन : शेकडो नागरिकांची जिल्हाकचेरीवर धडक अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे २००७ मध्ये महापूर आला होता. या गावाचे १०० टक्के पुनर्वसन शासनामार्फत करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीचे सचिव खोटा ठराव देऊन मंजूर कामे करण्यात अडथळा आणत असण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले. येथील सर्व शासकीय इमारती पुनर्वसनमध्ये याव्यात, यासाठी लेआऊटसुद्धा टाकण्यात आले आहे. परंतु या कामाला सचिव प्रतिसाद देत नसल्याने सर्व धनादेश परत जाण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. गावात मंजूर झालेले घरकूल हे पुनर्वसनात देण्यात यावे. गावठाण हे निळ्या पट्ट्यात आहे. तसेच गावात प्राधिकरणाद्वारा पिण्याच्या पाण्याची सोय करावी, रस्ते, नाल्या व रपट्यांची कामे करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी नरेंद्र खांडेकर, विनोद येवले, अण्णा खांडेकर, राजू ढगेकर, विश्वास ढगेकर, अर्चना ढगेकर, निर्मला ढगेकर, नामदेवराव गारपवार, पुनम नारोळकर, विश्वास डायलकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नालवाड्याच्या पुनर्वसनाला सचिवाचा अडथळा
By admin | Published: September 28, 2016 12:22 AM