लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व चार नवजातांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा नेमका आहे तरी काय? भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३०४ ला कायद्याच्या भाषेत "कल्पेबल होमिसाईड" असेही संबोधले जाते. ‘केल्या जाणाऱ्या कृतीमुळे संबंधिताचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही ज्ञात वा अज्ञातपणे केलेले मृत्यूला कारणीभूत ठरणारे कृत्य’ या कलमांतर्गत गुन्हा ठरते. खुनाच्या ३०२ कलमापासून हे कलम या अर्थाने वेगळे आहे.सदर कलमांतर्गतचा खटला चालविण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला आहेत. या कलमात पोलिसांना जामीन देण्याचे अधिकार नाहीत. दोष सिद्ध झाल्यास जन्मठेप वा दहा वर्षांचा तुरुंगवास तसेच दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे.
कलम ३०४ : ‘कल्पेबल होमिसाईड’
By admin | Published: May 31, 2017 12:23 AM