शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:35 PM

मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देपिवळ्या मातीचा सर्रास वापर : धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले; नागरिकांमध्ये संताप

सुमित हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन पुढे न्यावे लागत आहे.काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हिरव्या झाडांच्या कत्तलीनंतर खोदलेल्या रस्त्यात मुरुमाऐवजी मोठ्या प्रमाणात पिवळी माती भरली जात आहे. वास्तविक, काँक्रीटीकरणासाठी त्याखाली ४० मी.मी. दगड, मुरुमाचा थर आवश्यक असतो. रस्त्याची मजबुती भविष्यात किती राहील, हेच यावरून स्पष्ट होते. पिवळ्या मातीवर लगेच पाणी मारणे गरजेचे असताना एका टँकरने रस्त्याच्या कडा भिजविल्या जात आहेत. परिणामी या कच्च्या रस्त्यावरून मोठी वाहने धूळ उडवत जातात. यामुळे समोरून येणारी वाहने दिसणे कठीण असल्याने येथे नुकतेच दोन अपघात झाले आहेत.दररोज अपघातसोमवारी सकाळी ११ वाजता हैदतपूर गावानजीक पिवळ्या मातीच्या धुळीमुळे तुरीची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यावेळी रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी एक युवक आपल्या ८० वर्षीय आजीला दुचाकीवर घेऊन जात होता. पिवळ्या मातीवरून त्यांचे वाहन घसरून वृद्धा खाली कोसळली.कुठे आहेत सुरक्षेचे उपाय?राष्ट्रीय मार्गाचे काम एचडी कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. या वाहतुकीच्या रस्त्यावर कुठेही सुरक्षा कठडे, फलक दिसत नसून, केंद्र शासनाने मंजूर केलेला हा रस्ता सामान्य नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कंत्राटदाराने वेळीच सुरक्षिततेचे उपाय न केल्यास नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Accidentअपघात