शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

पाचशे कोटींच्या शहानूर प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:03 PM

अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकल्प वाऱ्यावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देधोकादायक रेनकट्स : धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे, प्रकाश व्यवस्था नाही, संगणकीय यंत्रणा बंद, रस्ताच शिल्लक नाही

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकल्प वाऱ्यावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.अचलपूर तालुक्यातील वाघोली गावाजवळ शहानूर नदीवर हा प्रकल्प आहे. १९८९ मध्ये पूर्ण झालेल्या या धरणावर ९ हजार ३३० हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. या प्रकल्पावरील मुख्य धरणाची लांबी ७९५ मीटर, तर उंची ५६.४५ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४६.०४ द.ल.घ.मी. असून, पूर्ण संचय पातळी ४४२.५० मीटर आहे.सिंचनासह पिण्याच्या पाण्याकरिता वरदान ठरलेले शहानूर धरण उंचावर आहे. यामुळे आपत्कालीन स्थिती लवकरच निर्माण होते. धरणावरील आपत्कालीन स्थितीवर लक्ष ठेवण्याकरिता संगणकीय यंत्रणा बसविण्यात आली होती. पण, ही संगणकीय यंत्रणा काही वर्षांपासून प्रकल्पस्थळी धुळखात आहे. त्यावर अनेकांनी त्यावर ताशेरे ओढले आहे. महालेखापरीक्षकांनी तर त्यावर आॅडिट पॅरा काढला असून, आजही तो आॅडिट पॅरा कायम आहे.धरणावर २४ तास विजेचा पुरवठा अत्यावश्यक ठरतो. पण, शहानूर धरणाला गावठाण फीडरवरून तेथे होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. धरणावर एक जनरेटर आहे. पण या जनरेटरची स्थितीही नाजूक आहे.भिंतीवरून धरणाच्या गेटकडे जाणाºया मार्गातील १७ खांबांपैकी एकावरही दिवा नाही. कव्हरही फुटलेले, तुटलेले, वायर कापलेले आहेत. या दरम्यान सोलर दिव्याचे उंचीला लहान असलेले चार खांब आहेत. यातील एकाच खांबावर दिवा असून, तो चालू की बंद, हे ठरवता येत नाही. प्रकल्पस्थळावरची प्रकाश व्यवस्था कोलमडल्याने सर्वत्र काळोख असतो. याशिवाय कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे पाचशे कोटींचा हा प्रकल्प वाºयावर आहे. प्रकल्पाची आणि प्रकल्पावर येणाºया पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.झाडांचा नायनाट केव्हा?...: मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस हे रेनकट्स आहेत. पावसामुळे पडलेल्या लहान-मोठ्या भेगा आणि रेनकट्स पावसाळ्यापूर्वीच दुरूस्त करणे अत्यावश्यक ठरतात. पावसाळा तोंडावर आला असला तरीही धरणाच्या भिंतीवरील झाडे आणि रेनकटस् आजही तशीच आहेत.लिम्कामध्ये विक्रमाची नोंद...: अंजनगाव-दर्यापूर तालुक्यातील १५४ गावांची पाणीपुरवठा योजना याच धरणावर आहे. पथ्रोटकरिता प्रस्तावित पाणीपुरवठा योजना याच धरणावरून असून कामास सुरुवात झाली आहे. १५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.धरणाच्या भिंतीवर झाडे...तज्ज्ञांच्या मते धरणाच्या भिंतीवर झाडे नकोत. असल्यास ती काढून त्यांची मुळं पेट्रोल टाकून जाळून टाकायला हवीत. पण, याबाबत धरणावर कुठलेही नियोजन बघायला मिळत नाही.डांबरी रस्ताही उद्ध्वस्तशहानूर धरणावर जाण्याकरिता परतवाडा-अंजनगाव रोडवर पांढरी गावापासून आठ किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता आहे. दोन किलोमीटरचा अपवाद वगळता या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. प्रकल्पावर सिंचनादरम्यान निर्माण होणाºया विजेची निर्मिती २०१५-१६ पासून बंद पडली आहे.