शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

हेमंत पवार बघा, नववीच्या विद्यार्थ्यांना गुणाकारही येईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:11 PM

सरकारे ‘राइट टू एज्युकेशन’वर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, दुसरीकडे महापालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.

ठळक मुद्देगुणवत्ता टांगणीला : महापालिका शाळांची किती ही विदारकता!

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरकारे ‘राइट टू एज्युकेशन’वर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, दुसरीकडे महापालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. भौतिक सुविधांवर निधीची उधळण होत असताना शैक्षणिक गुणवत्ता माघारल्याचे क्लेशदायी चित्र आहे. अमरावतीच्या महापालिका शाळांची तशीच विदारक अवस्था असून, नववीच्या विद्यार्थ्यांना साधा गुणाकार येत नसल्याची गंभीर वस्तुस्थिती उघड झाली आहे.गंभीर त्रुटींवर कटाक्षमहापालिका आयुक्त हेमंत पवार यांची बºयाच मुद्यांवर पाठराखण करणाºया आ. सुनील देशमुख यांनी महापालिका शाळेच्या या गंभीर दुरावस्थेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र आयुक्तांना लिहिले आहे. १८ जानेवारीला आ. देशमुख यांनी नेहरू मैदान स्थित हिंदी व मराठी शाळेला प्रार्थनेच्या वेळी भेट दिली. त्यांच्यासमवेत पाचही झोनचे शाळा निरीक्षक होते. वर्गवार भेटी देत असताना नववीच्या विद्यार्थ्यांना ४१३ गणिले ९ या हा गुणाकार, पाच ज्ञानेंद्रियांची नावे विचारली. एक विद्यार्थी वगळता, इतर कुणालाही उत्तर देता आले नव्हते. पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना चारचा पाढा म्हणता आला नाही.

गंभीर स्वरूपाच्या त्रुटीमुख्याध्यापकासह शिक्षक गैरहजर असणे, त्यांचा रजेचा अर्ज नसणे, रजेबाबत उपस्थिती रजिस्टरमध्ये नोंद नसणे, पटसंख्या बहुतांश कमी असणे, वेळेपर्यंत चाचणी पेपर उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या गंभीर त्रुटीही आढळून आल्या आहेत. स्वच्छता कर्मचारी असतानाही कमालिची अस्वच्छता आढळून आली.देशमुखही म्हणतात, वचक नाही!गुणवत्तावाढीसाठी शिक्षक गंभीर नसल्याचा विपरीत परिणाम गरिबांच्या पाल्यांवर होत आहे. शाळा निरीक्षकांच्या पाक्षिक अहवालातून या गंभीर स्थितीचे आकलन झाले नाही. कागदोपत्री अहवालाची पूर्तता तेवढी होत आहे. शिक्षण यंत्रणेवर प्रशासनाचा वचक नाही, अशी खंत आ.सुनील देशमुख यांनीही आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली.