शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतमाल पिकवायचे. परंतु या पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात कसे होईल, यासाठी शेतकरी धावपळ करत असतो. हीच शेतकऱ्यांची धावपळ बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी बघून त्यांना आपल्या कंपनीचे बियाणे कसे दर्जेदार आणि विश्वासाचे आहे, हे पटविण्यासाठी ग्रामीण भागात सध्या भित्तीपत्रकाद्वारे दिसत आहे.
सध्या सरकी, सोयाबीन, तूर आदी बियाणे कृषी केंद्रांमध्ये विक्रीकरिता दाखल झाले असले तरी सगळीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त किमती बियाणे विकत घ्यावे लागतील काय? या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
बियाणे कंपनीतर्फे गावातील प्रत्येक बस स्टॅन्ड असो, पानटपरी असो किंवा गावातील येणारा मुख्य रस्ता असो तेथे बियाण्यांचे मोठे पोस्टर लावून शेतकऱ्यांना आकर्षित करताना दिसत आहे. शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा त्या बियाण्यांच्या पोस्टरकडे आकर्षित होत असल्याचे विदारक चित्र धामणगाव तालुक्यात दिसून येत आहे.
कृषी केंद्रचालकांऐवजी बियाणे कंपनीचे सेल्समन शेतकऱ्यांना बियाण्यांची इत्थंभूत माहिती देऊन आकर्षित करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
पैशाची जुळजुळवा सुरू
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी कसरत सुरू झालेली आहे. परंतु बँकेने कर्ज नाकारल्याने काही शेतकरी जुळवाजुळवीसाठी दोरोदारी फिरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.