गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातच नव्हे तर देशात बंदी असणाऱ्या कपाशी बियाण्यांचा मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथूनही वरूड, मोर्शी तालुक्यात शिरकाव होत आहे. यासाठी दुचाकीने वाहतूक करण्याचा नवा फंडा शोधण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात बियाण्यांचा एक ट्रक या भागात आल्याची माहिती मिळाल्याने जिल्ह्याच्या भरारी पथकाने जाळे पसरले. मात्र, सुगावा लागताच या ट्रकने मध्य प्रदेशात पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.राज्याची व जिल्ह्याची सीमा असलेल्या वरूड तालुक्यातून दुचाकीद्वारे प्रतिबंधित बियाण्यांची काही पाकिटे जिल्ह्यात आणली जातात. काही शेतकऱ्यांनी या बियाण्यांची पेरणीदेखील केल्याची माहिती समोर आली आहे. मान्यताच नसल्याने या बियाण्यांचे तंत्रज्ञान नेमके कोणते व बियाण्यांची कोणतीही खात्री नसल्याने पायावर धोंडा मारून घेण्याचा हा प्रकार ठरणार आहे. खरेदीची कोणतीही पावती नाही तसेच राज्याबाहेर अधिकारी, नियम सर्व काही वेगळेच असल्याने यामध्ये फसगत झाल्यास दाद कुणाकडे मागणार, हा प्रश्न पुढे आला आहे.पांढुर्ण्यातून अमरावती जिल्ह्यात शिरकाव करण्यास सोईचे असल्याने मध्यप्रदेशातील काही विके्रत्यांनी या भागात नेटवर्क उभारले आहे. फोनवरूनही बाजाराच्या दिवशी बियाण्यांची डिलिव्हरी देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली. काही व्यक्तींद्वारे हे बियाणे वापराविषयी आंदोलन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणावर सुनावणी होत आहे. या प्रकारात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास द्यायचा नाही, अशा सूचना असल्याने शेतकºयांच्या नावावर काहींनी हा गोरखधंदा उभारल्याची माहिती समोर आली आहे. याला कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागानेही दुजोरा दिला आहे.लॉकडाऊनमध्ये जिल्हा सीमेतून घुसखोरीलॉकडाऊनच्या काळात थोडी शिथिलता आल्यानंतर या भागात प्रतिबंधित बियाण्यांची डिलिव्हरी करण्यासाठी एक ट्रक आल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळताच, जिल्हा पथक सतर्क झाले. त्यांनी सापळा रचला. मात्र, याचा सुगावा लागताच ट्रकने मध्य प्रदेशकडे पोबारा केल्याचे एका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, या काळात अधिकाºयांच्या दौऱ्याला बंधने येत असल्याचा फायदा घेण्याचा प्रकार कृषी विभागाच्या सतर्कतेने फसला.डमी ग्राहकाचा प्रयोग फसलामध्य प्रदेशातून बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी विभागाने सापळा रचून डमी ग्राहक तयार केले. परंतु, त्यांना हे बियाणे मिळू शकले नाही. या भागात अशा प्रकारच्या बियाण्यांचा स्टॉक केला जात नाही; केवळ याच परिसरातील परिचित व्यक्तींच्या माध्यमातून मोबाईलद्वारे संपर्क करून बियाणे दिले जात असल्याचे कृषी विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले. त्यामुळे आता सतर्कता बाळगून कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पांढुर्ण्याहून दुचाकीने येतात बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 5:00 AM
राज्याची व जिल्ह्याची सीमा असलेल्या वरूड तालुक्यातून दुचाकीद्वारे प्रतिबंधित बियाण्यांची काही पाकिटे जिल्ह्यात आणली जातात. काही शेतकऱ्यांनी या बियाण्यांची पेरणीदेखील केल्याची माहिती समोर आली आहे. मान्यताच नसल्याने या बियाण्यांचे तंत्रज्ञान नेमके कोणते व बियाण्यांची कोणतीही खात्री नसल्याने पायावर धोंडा मारून घेण्याचा हा प्रकार ठरणार आहे.
ठळक मुद्देनवा फंडा : सुगावा लागताच वाहनांचा मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोबारा