अमरावती : बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या महिलेच्या खुनाची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला शुक्रवारी अखेर यश आले. पत्नीला नुकतीच ओळख झालेल्या एका परपुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने पतीच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याचवेळी पतीने तिचे केस पकडून डोके ओट्यावर आपटून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार आरोपी पतीला मध्यप्रदेशातून त्याच्या मुळ गावातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी दिली.
लक्ष्मण मानसिंग मरावी, (३४, रा. ओहनी, जि. मंडला, मध्यप्रदेश) असे अटक आरोपी पतीचे नाव आहे. तर मृत महिुलेची ओळख भागवती लक्ष्मण मरावी (३८, रा. ओहनी) अशी पटविण्यात आली. बडनेरा पोलिसांनी या प्रकरणात आधी शेखर उर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर (३४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बडनेरा) याला अटक केली होती. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावरील जुन्या वस्तीच्या बाजूने तिकीट घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. मात्र १७ पर्यंत तिची ओळख पटली नव्हती.
४७ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासलेदरम्यान, ठोस माहितीच्या आधारे आरोपी शेखर चिंचोळकर याला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने १४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. परंतु, त्यानंतरही मृत महिलेची ओळख न पटल्याने गुन्हे शाखेच्या युनिट दोनने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. तब्बल ४७ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो व अन्य माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मृतक महिलेची ओळख पटविण्यात यश आले.
मागील आठवड्यात आले होते अमरावतीतमृतक ही भागवती मरावी असल्याचे उघड झाल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी रात्री तिचा पती लक्ष्मणला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. लक्ष्मण मरावी हा पत्नी भागवती हिच्यासोबत कामाच्या शोधात अमरावतीत आला होता. ते दोघे बडनेरा परिसरात काम शोधत होते. १४ ऑक्टोबर रोजी त्यांची बडनेरातील भगतसिंग चौकात शेखर चिंचोळकरशी भेट झाली. दोघांनाही काम मिळवून देतो, असे आश्वासन देत शेखरने दोघांनाही स्वत:च्या घरी थांबण्याचा आग्रह धरला. पण, लक्ष्मणने त्याला नकार दिला.
विट घातली डोक्यातदरम्यान काम न मिळाल्याने मरावी दाम्पत्य १४ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकाकडे निघाले. त्यावर मी तुम्हाला रेल्वे स्थानकावर सोडून देतो, असे शेखरने म्हटले. त्यानंतर तिघेही रेल्वे स्थानकावर पोहोचले. लक्ष्मणने गावी जाण्यासाठी गोंदियापर्यंतचे दोन तिकीट काढले. काही वेळाने शेखर दारू घेऊन आल्यावर तिघांनीही वाहनतळानजीक पाण्याच्या टाकीखाली मद्यप्राशन केले. लक्ष्मणला दारू चढल्याने तो तेथेच झोपी गेला. दरम्यान, रात्री १०.३० च्या सुमारास वेळाने जाग आल्यावर लक्ष्मणला पत्नी आणि शेखर आक्षेपार्ह स्थितीत दिसले. लक्ष्मण शिव्या देत उठल्यावर शेखर तेथून पळून गेला. त्यानंतर लक्ष्मणने रागाच्या भरात भागवतीचे डोके ओट्यावर आपटले तसेच विटेने तिच्या डोक्यावर वार केले.