लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रचलित परीक्षा पद्धतीत बदल करून नव्याने सेमिस्टर पॅटर्न (गृह परीक्षा) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या हिवाळी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्ननुसारच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल. प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे.विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या निर्णयानुसार प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा, मूल्यांकन आणि निकाल घोषित करणे आदी भूमिका महाविद्यालयांना बजावावी लागणार आहे. परीक्षेसाठी लागणारा खर्च विद्यापीठ प्रशासन देईल, असा निर्णय घेण्यात आला. विशेषत: अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच परीक्षेचा अर्ज सादर करावा लागणार आहे. सेमिस्टर पॅटर्न परीक्षेसाठी विद्यापीठ वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व परीक्षेशी संबंधित खर्च अदा करेल, असे ठरविले आहे. महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या घेतलेल्या परीक्षेचे मूल्यांकन विद्यापीठाकडून रॅण्डम पद्धतीने घेण्यात घेईल. परीक्षेच्या तीन महिन्यांनंतर कोणत्याहीक्षणी क्रॉस चेकिंग म्हणून उत्तरपत्रिका तपासली जाईल. त्यासाठी विद्यापीठात स्वतंत्र चमू नेमली जाईल. महविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही प्रचलित पद्धतीनेच होणार आहे.परीक्षा महाविद्यालय, तर पदवी विद्यापीठ देणारयंदापासून सेमिस्टर पॅटर्न परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम वर्षाची परीक्षा महाविद्यालय, तर उर्वरित परीक्षा विद्यापीठ घेणार आहेत. सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षेअंती पदवी ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून दिली जाणार असून यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, हे विशेष.सेमिस्टर पॅटर्ननुसार प्रथम वर्षाची परीक्षा ही त्याच महाविद्यालयास घ्यावी लागेल. परीक्षेसाठी लागणाºया सोई-सुविधा महाविद्यालयांना उपलब्ध कराव्या लागतील. परीक्षेबाबत काही अडचणी आल्यास त्या नव्या प्राधिकरणासमोर मांडून त्या सोडविल्या जातील.- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, विद्यापीठ
विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्नवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 9:20 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रचलित परीक्षा पद्धतीत बदल करून नव्याने सेमिस्टर पॅटर्न (गृह परीक्षा) घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देहिवाळी सत्र : महाविद्यालयांकडे परीक्षेची जबाबदारी