शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

बनावट बीअरचा साठा जप्त

By admin | Published: September 13, 2015 12:04 AM

भिवकुंडी येथे ठाणेदार सुधीर पाटील आणि त्यांच्या चमुने धाड टाकून मध्य प्रदेशातून तस्करीव्दारे आणलेला ‘बीअर’चा साठा जप्त केला.

मोर्शी पोलिसांची कारवाई : १ लाख १३ हजारांचा माल मोर्शी : भिवकुंडी येथे ठाणेदार सुधीर पाटील आणि त्यांच्या चमुने धाड टाकून मध्य प्रदेशातून तस्करीव्दारे आणलेला ‘बीअर’चा साठा जप्त केला. मागील १५ दिवसांत पोलिसांनी अवैध दारू आणि वाहनांसह जवळपास १ लक्ष १३ हजार रुपयांचा माल जप्त केला. जुगार खेळणाऱ्यांवर धाडी टाकून अनेकांना अटक केली आहे.भिवकुंडी येथे आरोपी भाऊराव मरसकोल्हे (३८) याने पोळ्याच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात बियर आणून ठेवल्याची माहिती ठाणेदार सुधीर पाटील यांना मिळाली. त्यांनी आरोपी भाऊराव मरसकोल्हे याच्या घरावर धाड टाकून मध्य प्रदेशातून आणलेल्या बीअरचा ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आणि आरोपीला अटक केली. ठाणेदार सुधीर पाटील यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक फुलेकर, जमादार शेंडे, उदापुरे, राजकुमार, पोलीस राऊत, चालक कडू यांनी ही कामगिरी पार पाडली. पोळा आणि पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाकडे पाहता मागील १५ दिवसांत मोर्शी पोलिसांनी जुगार आणि अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द धाड सत्र राबविले आहे. जुगाराच्या एकूण १३ धाडी टाकून ४५ आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचेकडून २८,९३० रुपये जप्त करण्यात आले आहे. याशिवाय अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द १४ धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून एकूण १ लक्ष १३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. विशेष असे की, अवैध दारू वाहतुकीप्रकरणी जप्त करण्यात आलेली वाहने सरकारजमा करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आल्याचे ठाणेदार सुधीर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवैध दारू आणि जुगाराविरुध्द धाडसत्र सातत्याने पुढे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)