फोटो -
अमरावती : अकलूज येथे कार्यरत प्राध्यापक राजश्री रामकृष्ण निंभोरकर (किटुकले) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वस्त्रशास्त्र व परिधान विषयात आचार्य पदवी प्रदान केली. ‘ऑप्टिमायझिंग डाईंग पॅरामिटर्स ऑफ नॅचरल कलरंट फॉर टेक्सटाईल सबस्ट्रेट’ हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. त्यांना शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या गृहविज्ञान विभागप्रमुख अंजली देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
------------
योग शिबिर २ ऑगस्टपासून
अमरावती : ओवायएफ या संस्थेकडून २ ऑगस्टपासून महिला व पुरुषांकरिता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ शाळेनजीक संस्थेच्या कार्यालयात हे शिबिर होईल. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक उमेश पनपालिया, प्रशांत पनपालिया, संजय अग्रवाल, राज पनपालिया, योग प्रशिक्षक मनीष देशमुख यांनी केले आहे.
--------------
मुलीला फूस लावून पळविले
अमरावती : स्थानिक कमलपुष्प कॉलनी येथून एका मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार हर्ष मनवर (१८, रा. मेघनाथपूर, ता. अचलपूर) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
मुली झाल्या म्हणून महिलेचा छळ
बडनेरा : कुटुंबात दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीने महिलेला मारहाण तसचे मानसिक छळ केला. त्यामुळे सदर महिला माहेरी निघून आली. याप्रकरणी फिर्यादीची तक्रार व महिला साहाय्य कक्षाच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी कल्पेश शिवप्रसाद व्यास (३९, रा. आष्टी, जि. अमरावती) याच्याविरुद्ध ३० जुलै रोजी गुन्हा नोंदविला. २००८ मध्ये लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नाना छळांना सामोरे जावे लागले, असे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे.