अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर गत ११ फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. आता शेवटचा टप्पा गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यात दोन तालुक्यांतील ६ ग्रामंपचायतींत सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा होणार आहेत.
जिल्हाधिकारी यांनी ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शासकीय कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सहा टप्प्यात सरपंच व उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार यांच्या नेतृत्वात संबंधित तालुक्यातील गावांत राबविण्यात आली. यात ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पाच टप्प्यात सरपंच, उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया राबविली आहे. यात धामणगाव रेल्वे तालुक्यात ५ आणि नांदगाव खंडेश्र्वरमधील अडगाव बु। या एका ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.