दर्यापूर तालुक्यातील सरपंच-उपसरपंचपदाच्या अंतिम टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत नालवाडा येथे निर्मला श्रीकृष्ण चव्हाण व रमेश ठाकरे, रामगाव येथे छाया संजय घरडे व संगीता प्रमोद चारथड, वरूड बु. येथे वर्षा रमेश कोरपे व रेणुका मुरलीधर मेहेंगे, नरदोडा येथे सोनम वैभव टाले व विनोद उमक, कान्होली येथे अंजली नितीन राऊत व तृप्ती प्रशांत राऊत, वडनेरगंगाई येथे गोकर्णा सुभाष इंगळे व मोहिनी चंद्रशेखर हुतके, ईटकी येथे विजय पांडुरंग मोहोड व मंगला राजीव वाळसे, नाचोना येथे विजय अढाऊ व राहुल वानखडे, लेहेगाव येथे प्रवीण डोंगरदिवे व अलका स्वप्निल मात्रे यांची निवड झाली. अडुळाबाजार येथे सरपंचपदाकरिता राखीव प्रवर्गातून अर्ज प्राप्त झाला नाही, तर उपसरपंचपदी रियानाबी रिजवान बेग यांची निवड झाली.
चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथे राजेश कवळे व राजेश आठवले, शहापूर मलाय गणाजी दांडेकर व बाबू हेकडे, तर सलोना येथे आरती सुरेश बेलसरे व रेखा मारुती गायन हे सरपंच-उपसरपंच झाले.
धारणी तालुक्यात टेंबली येथे रवि भिलावेकर व मंगा पाटील, खा०याटेंभरू येथे शोभाराम कासदेकर व लता संतोष बैस, टिंग०या येथे राहुल पटेल व घनश्याम धुर्वे, कारादा येथे बबीता भैयालाल भिलावेकर व सोनाजी पाटणकर, धारणमहू येथे रामप्यारी राजकुमार मालवीय व राजकुमार मालवीय, दिया येथे निशा शोभाराम भिलावेकर व सावित्री सुरेश जयस्वाल सरपंच-उपसरपंचपदी आरूढ झाले. रत्नापूर येथे सभा तहकूब करण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फुबगाव येथे शोभा किशोर ढवळे व दिनेश धवस, एरंडगाव येथे माया पांडुरंग घोडे व संदीप भले, ढवळसरी येथे अली मलीक मुजफ्फर व वसंत माणके, धानोरा शिक्रा येथे लता मालगाये व मारुती रामटेके, धानोरा गुरव येथे अश्विनी शिंदे व प्रमोद कोहळे, धानोरा फशी येथे वसंत शिसोदे व रूपाली वावगे, बेलोरा धामक येथे सुषमा ढोकणे व दिलीप सोरते, दहिगाव येथे दीपाली उघडे व प्रिया चोपडे, दाभा येथे अर्पिता वाठ व शुभम गेडाम, बेलोरा हिरापूर येथे माधुरी चौधरी व सचिन आढवले यांची सरपंच-उपसरपंचपदी निवड झाली. वरूड तालुक्यातील बहादा येथे वर्षा सुनील चौधरी व कविता प्रवीण गवळी यांची निवड झाली.