लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विकासाचा प्रवाह गतिमान करण्याच्या हेतूने स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व मुद्रा लाभार्थी सन्मान सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विवेक कलोती, जयंतराव डेहणकर, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघडे चौधरी, किरण पातुरकर, शरद बंड, सोपान गुडधे, गिरीश शेरेकर, हरीश साऊरकर, विलास राठोड, बादल कुलकर्णी, आशिष राठोड, सुनील चरडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, क्रांती काटोले, प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते. प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. नेहरू मैदानावरील विस्तीर्ण मंडपात हा मेळावा पार पडला. विविध विभागांचे ३० हून अधिक कक्ष सहभागी होते. मेळाव्याला भरघोस प्रतिसाद लाभला. एक हात गमावल्यानंतरही जिद्दीने मूर्तिकला साकारून यशस्वी व्यवसाय करणाऱ्या अचलपूरच्या उमेश बडोदेंसह सचिन पुंडलिकराव ढोक, अभिजित किशोरराव मालखेडे, निखिल फंदे, अकबर शेख, आसियाबानो मो. इरफान, परवेज अहमद गुलाम नबी यांच्यासह अनेकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी भूमिका विषद केली. अग्रणी बँकेचे रामचंद्र देशमुख यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी केले.
विविध योजनांतून स्वयंरोजगार निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:58 PM
विकासाचा प्रवाह गतिमान करण्याच्या हेतूने स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व मुद्रा लाभार्थी सन्मान सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्देपालकमंत्री : जिल्हा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद