संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अन्न व औषधी प्रशासनाने परिपत्रक काढून १ ऑक्टोबरपासून मिठाईच्या ट्रेसमोर किंवा काचेच्या काऊंटरवर बेस्ट बिफोर म्हणजे किती दिवसांत मिठाई खाण्यास उपयुक्त आहे, याची मुदत लिहिणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात सोमवारी लोकमतने शहरातील स्वीट मार्टमध्ये जाऊन चेक केले असता, पाचपैकी तीन (६० टक्के) मिठाई विक्रेत्यांनी बेस्ट बिफोरच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले.मिठाई विक्री नियमावलीचे परिपत्रक एफडीएने सप्टेंबर महिन्यात काढून त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२० पासून करण्याच्या सूचना करण्यात विक्रेत्यांना दिल्या आहेत. 'लोकमत'च्या पाहणीत गाडगेनगरातील दोन विक्री क्रेंद्रांत नियमांचे पालन नियमांचे पालन केल्याचे आढळून आले. पंचवटी चौकातील एका हॉटेलमध्ये ऐनवेळी स्टिकर तयार करायला टाकले असल्याचे सांगितले. इर्विन चौकातील दोन मिठाई विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केले. तिघांना नियमावलीची कल्पना होती, तर दोन हॉटेलचालकांना माहितीच नसल्याची बाब समोर आली. तीन ग्राहकांनी बेस्ट बिफोर तपासून मिठाई खरेदी केल्याचे सांगितले. दोन ग्राहकांनीही अनभिज्ञता दर्शविली.
उल्लंघन केल्यास कारवाईमिठाई विक्री करताना नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी 'बेस्ट बिफोर' लिहिणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघंन केल्यास अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली जाते. स्थानिक अधिकऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना नवीन नियमांचे माहिती दिली आहे.- सागर तेरकर, प्रभारी सहायक आयुक्त (अन्न)
'बेस्ट बिफोर' लिहूनच विक्रीमिठाई विक्री करताना 'बेस्ट बिफोर' लिहण्याची माहिती एफडीच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. आम्ही तशी मुदत जाहीर केली आहे. मिठाईची विक्री नियमानुसार करण्यात येत आहे.- विनय पोपट, मिठाई विक्रेता, गाडगेनगर