लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता सेमिस्टर पॅटर्नची गुणपत्रिका महाविद्यालयस्तरावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना ‘विथहेल्ड’ निकालासंदर्भात विद्यापीठात येरझारा मारण्याची गरज राहणार नाही, अशी तयारी विद्यापीठाने केली आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा प्रणाली ही सेमिस्टर पॅटर्ननुसार घेण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभर परीक्षांची प्रक्रिया सुरू राहते. सेमिस्टर पॅटर्न परीक्षेने विद्यार्थी, महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात निरंतर समन्वय राहत असला तरी प्रथम, द्वितीय व तृतीय सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय चवथ्या सेमिस्टर परीक्षेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे बरेचदा संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ मध्ये ठेवण्यात येते. निकाल का जाहीर करण्यात आला नाही, याची विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांची विद्यापीठात एकच गर्दी होत असल्याचे नियमित चित्र आहे. हीच बाब पाचवे, सहावे आणि सातवे सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आठव्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येत नाही. निकाल ‘विथहेल्ड’ मध्ये का ठेवण्यात आले, याची माहिती महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे दिल्या जात नाही.निकाल विद्यापीठाने रोखले असे सहजतेने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून सांगण्यात येते. त्यामुळे पाचही जिल्ह्यातून निकालाबाबत विचारणा करण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात येतात. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना परीक्षा अनुत्तीर्ण असल्याबाबत सांगण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी विद्यापीठात होते. ही गर्दी विद्यापीठात आता होणार नाही, आठवे सेमिस्टर पॅटर्नची परीक्षा वगळता अन्य निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांची गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयात पाठविली जाणार आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८३ महाविद्यालयांसाठी ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे मान्यतेसाठी फाईल सादर करण्यात आली आहे.निकाल कोणत्या कारणांनी रोखण्यात आला याकडे महाविद्यालय लक्ष देत नाही. विनाकारण विद्यार्थ्यांना त्रास देत निकालाबाबतची माहिती विचारण्यासाठी विद्यापीठात पाठविले जाते. आता हा त्रास संपणार आहे. महाविद्यालयांना गुणपत्रिका पाठविली जाणार आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.महाविद्यालयांना ठेवावा लागेल निकालाचा डाटासेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे निकाल आणि विद्यार्थी संख्येबाबत महाविद्यालयांना अपडेट डेटा ठेवावा लागणार आहे. चवथे आणि आठवे सेमिस्टरचे निकाल रोखण्यात येईल. अन्यथा उर्वरित निकालाची गुणपत्रिका महाविद्यालयांकडे पाठविली जाईल. गुणपत्रिका महाविद्यालयातूनच वितरीत केली जाणार आहे.
सेमिस्टर गुणपत्रिका महाविद्यालयस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता सेमिस्टर पॅटर्नची गुणपत्रिका महाविद्यालयस्तरावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ...
ठळक मुद्देविद्यापीठाकडून प्राचार्यांना पत्र : ‘विथेल्ड’ निकालाचा त्रास थांबणार