लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. पहिल्यांदाच सर्व विद्याशाखांसाठी नवा पॅटर्न लागू झाला असून सुमारे ९० अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याची तयारी करण्यात आली आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१७-१८ याकरिता सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून प्राचार्यांना सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे नियोजन करण्याबाबत पत्र पाठविले आहे. हिवाळी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून प्राप्त होतील. मात्र एकंदरीत परीक्षा घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता महाविद्यालयांना करावी लागणार आहे. ३० जून २०१७ रोजी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने अनुक्रमांक १३९ अन्वये सेमिस्टर पॅटर्न परीक्षेची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने हिवाळी परीक्षेची तयारी चालविली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा विद्यापीठस्तरावर घेण्याबाबत एकमत झाले आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने तयार केले असून प्राचार्य केंद्राधिकारी राहतील. महाविद्यालयात होणाºया परीक्षांचे पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कस्टडीत मोहरबंद करून ठेवले जातील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तसेच तासिका तत्त्वावरील मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून करून घेण्याची जबाबदारी प्राचार्यावर सोपविली आहे. परीक्षा संपल्यानंतर विहित नमुन्यात निकाल तयार करून १५ दिवसांच्या आत निकालपत्राची संगणकीय प्रत महाविद्यालयांना विद्यापीठास पाठवावी लागेल. विद्यापीठाने विहित केलेली पुनर्मूल्यांकन पद्धती ही महाविद्यालयस्तरावर राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काचा महाविद्यालयात भरणा करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी ही महाविद्यालयीन स्तरावर दिली जाणार आहे. परीक्षादरम्यान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर कुलगुरु, प्र-कुलगुरु, परीक्षा मंडळाचे सदस्य, संचालक आस्कमिक भेटी देतील.परीक्षांदरम्यान महाविद्यालयांवर ही असेल जबाबदारीविद्यार्थ्यांच्या नामांकनाची यादी विद्यापीठाकडे पाठवावी लागेल. परीक्षा संचालनाकरिता प्राचार्यांनी केंद्राधिकारी, सहकेंद्राधिधारी, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका वितरित करणे आणि निकालाची प्रत, सारणी तक्ते विद्यापीठास सादर करावे लागेल. उत्तरपत्रिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत त्या जपून ठेवाव्या लागतील.सर्व विद्याशाखांचे पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा महाविद्यालयस्तरावर होणार असून प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पुरविल्या जातील. एरव्ही इत्थंभूत परीक्षेसंदर्भाची तयारी परीक्षा केंद्र असलेल्या प्राचार्यांना करावी लागेल.- जयंत वडते,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग
विद्यापीठात सेमिस्टर पॅटर्न परीक्षा १२ आॅक्टोबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 11:24 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षी सेमिस्टर पॅटर्ननुसार हिवाळी परीक्षा १२ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
ठळक मुद्देप्राचार्यांना नियोजनासंदर्भात पत्र: सर्व विद्याशाखांसाठी नवीन पॅटर्न लागू