अमरावती : येथील पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पशुपालक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने ‘पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना व ग्रामीण व्यवस्था’ या विषयावर चर्चासत्र पार पडले.
चर्चासत्राचे मुख्य मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना पशुधनाचे शेती व्यवसायातील व ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील स्थान याबाबत सविस्तर चर्चा केली.
कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहायक उदय देशमुख यांनी प्रास्ताविकात प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला व त्यांच्या कार्यलयाची माहिती दिली. प्राचार्य पी.डी. देशमुख यांनी महाविद्यालयातील विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली व पशुधनाचे महत्त्व सांगितले. संचालन श्रद्धा सदाफळे हिने केले. प्रास्ताविकात श्रेया गायकवाड हिने महाविद्यालयातील विविध उपक्रम व स्पर्धाबाबत माहिती दिली. आभार प्रदर्शन सलोनी जयस्वाल हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी नीतेश चौधरी व श्रद्धा देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांचे सहकार्य लाभले.