शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सिनेट निवडणूक : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रात्री उशीरापर्यंत मतमोजणी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 1:19 PM

यासोबत विद्या परिषदेच्या सहा जागांसाठी तर अभ्यास मंडळाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुखांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया सुरू

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) साठी रविवारी मतदार पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. परंतु रात्री उशिरापर्यंत मतदान छाननी प्रक्रियाच सुरू होती. दरम्यान, बुधवारी पहाटेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये तसेच ज्ञानस्रोत केंद्रातील अभ्यासिकेमध्ये मतमोजणी होत आहे.

मतमोजणी प्रक्रिया ही आठ टेबलवरसुरू आहे. सायंकाळी आठ वाजेपर्यंत गठ्ठे लावण्यात येत होते. यानंतर विद्याशाखा, पदवीधर, शिक्षक, आदी मतदारसंघनिहाय मोजणीसाठी मतपत्रिका ठेवण्यात आल्या. मतदान केंद्रावर नुटा, शिक्षण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जस्टिस पॅनलचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. उशिरा रात्रीपर्यंत निकाल येणार असल्याने विद्यापीठात मंगळवारी दिवसभर निकालाची चर्चा सुरू होती.

एकूण ३९ अधिसभा सदस्यांपैकी ३६ सदस्यांसाठी ही निवडणूक झाली. यात प्राचार्य संवर्गातून दहा व्यवस्थापन परिषद सहा, दहा महाविद्यालयीन शिक्षक, तीन विद्यापीठ शिक्षक, दहा नोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी निवडणुकीत लढत होत आहे. यासोबत विद्या परिषदेच्या सहा जागांसाठी तर अभ्यास मंडळाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुखांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे.

विजयी उमेदवार

  • तीन विद्यापीठ शिक्षक संवर्गात सामान्य वर्गवारीत डॉ. संदीप वाघुले यांना ३३ तर डॉ. अनिल नाईक यांना २४मते प्राप्त झाली. डॉ. संदीप वाघुले यांची अधिसभेवर निवड झाली. महिला वर्गवारीत डॉ. जागृती बारब्दे विजयी झाले. जागृती बारब्दे यांना ३५ मते तर डॉ. वैशाली धनविजय यांना २२ मते मिळाली.
  • विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दहा प्राचार्य संवर्गामध्ये एससी वर्गवारीत प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांना ६५तर डॉक्टर राजेंद्र रामटेके यांना४९ मते मिळाली. प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई विजयी झाले आहेत.
  • डी.टी. एन. टी. वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर राजेश चंदनपाट यांना४० तर विजय नागरे यांना ७४ मते मिळाली. डॉ. विजय नागरे विजयी झाले आहेत.
  • ओबीसी वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर उद्धव जाणे यांना४३ तर प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांना ७३ मते मिळाली असून प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट विजयी झाले.
  • महिला वर्गवारी प्राचार्य डॉक्टर मीनल ठाकरे यांना ५१ तर प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य यांना ६४ मते मिळाली. प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य विजयी झाले आहेत
टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावतीElectionनिवडणूक