आढावा बैठक : चरण वाघमारे यांचे सरपंच व सचिवांना निर्देशतुमसर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना सोसावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सचिवांनी या तात्काळ ठराव पंचायत समितीला सादर करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी दिले आहेत. तुमसर पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांना निर्देश दिले. या बैठकीला पंचायत समिती सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, गटनेता हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, मुन्ना फुंडे, राधेश्याम गाढवे, तहसीलदार बालपांडे, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे, कार्यकारी अभियंता मैदमवार, उपविभागीय अभियंता बावनकर उपस्थित होते. यावेळी आमदार वाघमारे यांनी सर्व अधिकाऱ्यांना, तालुक्यातील कुठल्याही गावात पाणीटंचाई सदृष्य राहू नये याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सचिव व सर्व पदाधिकारी व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शहरात अशुद्ध पाणी पुरवठाभंडारा : भंडारा शहरातील अनेक वॉर्डामध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना वैद्यकीय उपचारामुळे डॉक्टरांना हजारो रुपयांचे बिल द्यावे लागल्याचा प्रसंग ओढावला आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
पाणी टंचाईचा ठराव तातडीने पाठवा!
By admin | Published: April 11, 2017 12:38 AM