- सूरज दाहाट
तिवसा(अमरावती) : ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही.तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमातील वृद्धांची व्यथा लोकमतने मांडली होती, दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्धांनी व्यक्त केली होती 'दिवाळीला घरी नेणार का?'हा मथड्याखाली लोकमतने वृत्त तिन दिवसापूर्वी बातमी प्रकाशित केली होती त्यामुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघाले होते लोकमतच्या बातमीने सामाजिक संघटनांनी वृध्दाश्रमात आज बुधवारी धाव घेत वृद्धांना मदत केली त्यामुळे लोकमतचे आभार मानत लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. यांसह जिल्ह्यात एकूण आठ वृद्धाश्रम आहेत. पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे. ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत. दिवाळीला सोमवारी वसुबारसपासून सुरुवात होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता, आयुष्यात किती कष्ट सोसले, याची गणित त्यांनी मांडले. त्यापैकी कुलदीपकांसाठी खाल्लेल्या खस्ता वजाबाकीच्या खात्यात होत्या. कुटुंबापासून दुरावलो असलो तरी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा यापैकी अनेकींनी व्यक्त केली होती तिन दिवसापूर्वी लोकमतने या वृद्धाश्रमाची व्यथा मांडत पोटच्या गोळ्यांनी जन्म दात्यांना नाकारल्याने वृद्धाश्रमात वृद्धाची दिवाळीची व्यथा लोकमतने लोकदरबारी मांडली त्यामुळे तिवसा येथील शफीक शहा, शाबीर शहा,गणेश डोळस तरुणांनी या वृद्धाश्रमात भेट देऊन त्यांचे समवेत दिवाळी साजरी केली व त्यांना नवे वस्त्र दिले तर कुऱ्हा येथील अजिंक्यतारा ग्रुपच्या अनुप जयस्वाल,आशिष जुनेवाल,सागर चोकटे,रितेश नारळे,अजय महिंगे,गजानन जडे,अमित काळमोरे यांनी वृद्धांना फराळ व इतर साहित्य दिले तर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी वृद्धाश्रमात भेट दिली कोणी पुरण पोळी तर कोणी लुकडे,धोतर,साड्या,स्वेटर, मपलर,चादर ब्लँकेट वाटप केले
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने स्थापित केलेल्या वृद्धाश्रमातच या वृद्धांची दिवाळी साजरी करण्यात आली यानिमित्त त्यांना नवे वस्त्र, पंचपक्वान्नाचे ताट वाढले होते
लोकमतने या वृद्धाश्रमाची व्यथा मांडली त्यांच्या मुला,मुलींनी आपल्या आई वडिलांना नाकारले त्यामुळे ते दिवाळी असूनही वृद्धाश्रमात आहेत त्यामुळे त्यांना कुटुंब समवेत दिवाळी साजरी करण्यात आली नाही मात्र तिवसा तालुक्यातील सामाजिक संघटनांनी या वृद्धाश्रमात भेट देऊन त्यांना मदत केली त्यामुळे वृद्धांना दिवाळीच्या दिवाळीच्या दिवशी घरची आठवण आली नाही त्यामुळे लोकमतचे विशेष आभार -सुभाष सोनारे,व्यवस्थापक श्री गुरुदेव वृद्धाश्रम मोझरी
समाजात राहताना सामाजिक भावना असणे गरजेचे आहे आम्ही लोकमत मध्ये येथील वृद्धश्रमाची बातमी वाचली येथील वृद्धांनच्या आनंदात आपण पण सहभागी व्हावे यामुळे येथे दिवाळीच्या दिवशी येऊन त्यांना फराळाचे साहित्य वाटप केले त्याच्या आनंदात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न केला - आशिष जुनेवाल, कुऱ्हा