अमरावती : जिल्हा परिषदेत कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार सोमवारी बदलीपात्र ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली. यावर १८ ते २७ एप्रिलदरम्यान आक्षेप व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. त्यानंतर २ मे रोजी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्यानंतर ५ ते १५ मेदरम्यान प्रत्यक्षात बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषदेत संवर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्याची बदली प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता गटविकास अधिकाऱ्यांकडून संवर्गनिहाय ज्येष्ठता यादी १२ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत सादर करण्यात आली. या पाच दिवसांत जिल्हास्तरावर यादीची प्रक्रिया पूर्ण करीत सोमवारी सुमारे ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली.आहे. सदर यादीवर १८ ते २९ एप्रिल पर्यत आक्षेप व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. या आक्षेपांचे निराकरणानंतर२ मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे बदलीसाठी इच्छूक असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आता सोईची जागा मिळेल की नाही याची धाकधुक वाढली आहे.पंचायत समितीस्तरावर २२ एप्रिलपर्यत आक्षेप
१४ तालुक्यातील पंचायत समितीस्तरावर बदली प्रक्रियेसाठी सेवा ज्येष्ठता यादी १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली आहे. १३ ते २२ एप्रिल पर्यत या यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. ३० एप्रिलपर्यत निराकरणानंतर १६ ते २५ मे पर्यत बदली प्रक्रियेला सुरूवात होईल.