शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

पीडित रूग्णांची अंत:करणातून सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2015 12:11 AM

गरीब, गरजू आणि पीडित रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात येतात.

पालकमंत्री पोटे : युवा चेतना रथाला हिरवी झेंडीअमरावती : गरीब, गरजू आणि पीडित रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात येतात. केवळ औपचारिकता न ठेवता त्यांची डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी मनापासून सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. सोमवारी युवा चेतना दिनानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी युवाचेतना रथाला हिरवी झेंडी दाखवून रथ रवाना केले. आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पुढे म्हणाले, एड्सबाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असावा, तसेच या रूग्णांची आरोग्यसेवा करताना योग्य काळजी घ्यावी व त्यांना प्रेमाची वागणूक द्यावी. एड्स निर्मूलन हा समाजासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे व त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून एड्स रूग्णांसाठी चांगला संदेश द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. युवा चेतना दिनानिमित्त विद्यार्थिीनींनी पथनाट्य सादर करून एड्सचा रूग्ण व त्यांच्या संततीचा करण्यात येणारा तिरस्कार याबाबतच्या वस्तुस्थितीचे दर्शन घडविले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थिताना एड्स संरक्षण व सुरक्षेसंबंधीची शपथ दिली. या कार्यक्रमाला जिल्हा रूग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी व एड्स नियंत्रण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अजय साखरे यांनी मानले.