चिखलदरा : भूमकाकडे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सेमाडोह येथील कोरोन पॉझिटिव्ह महिलेचे नातेवाईक अनेकांच्या संपर्कात आले आहेत. परिणामी परिसरात दोन्ही ठिकाणी कोरोना चाचणी तपासणी केंद्र लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेमाडोह येथे कोरोना पॉझिटिव्ह निघालेली महिला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या उपचाराला न जुमानता, नजीकच्या भवई गावात नातेवाइकाकडे जाऊन तिने तेथील भूमकाकडे गावठी उपचार केले. यात महिलेचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारनंतर अंत्यसंस्कारापूर्वी त्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात तिचे नातेवाईक आणि नातेवाईकांच्या संपर्कात परिसरातील नागरिक आल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र तात्काळ लावण्याची मागणी गावकऱ्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोट
सेमाडोह व भवई येथे कोरोना तपासणी केंद्र लावण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. नागरिकांनी नियमांचे पालन करीत तपासणी करून घ्यावी.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा