तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाने भीषण रूप धारण केले आहे. तालुक्यातील दापोरी, हिवरखेड, डोंगर यावली, पाळा, चिखल सावंगी, खानापूर, पिंपळखुटा, अष्टगाव, दहसुर, पार्डी, मायवाडी, खोपडा, रिद्धपुर, खेड, तरोडा, नेरपिंगळाई, शिरूर, दाभेरी या गावांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे ही गावे सील करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासना ने कृती आराखडा तयार करुन जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजीत पध्दतीने लसीकरण करावे. जिल्ह्यातील १८ वर्षावरील नागरिकांचा आकडा विचारात घेता लसीची योग्य ती मागणी व साठा उपलब्ध करून द्यावा. विधानसभा निवडणूकीसाठी ज्या मतदान केंद्रांचा वापर केला जातो, त्याच मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण करीत असतांना सर्वांनाच ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही त्यामुळे लसीकरण केंद्रावरच ऑफलाईन नोंदणी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
निवडणूक बूथ निहाय लसीकरण केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:14 AM