धामणगांव रेल्वे : अल्प पाऊस व अल्प उत्पादन झाल्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे़सोमवार १२ जानेवारीपासून तालुक्यातील ३१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने रक्कम जमा होणार आहे़ ७ कोटी ७७ लाख रूपये तालुक्याला प्राप्त झाले असून वर्णाक्षरात गावाप्रमाणे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संजय गरकल यांनी दिली़यंदा अल्प पाऊस, नापिकी व ४६ पैसे आनेवारी जिल्ह्यात जाहीर झाली़ सर्वाधिक दुष्काळाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. यंदा दोन महिन्यांत तीन शेतकऱ्यांनी नापिकीमुळे जीवनयात्रा संपविली़ राज्य शासनाने शेतकऱ्यांना सर्वांगीण आर्थिक मदत करण्याचे विधानसभा अधिवेशनादरम्यान जाहीर केले होते़ त्याप्रमाणे तालुक्यातील २३ हजार ६७ अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे़ या शेतकऱ्यांचे ३७ हजार ८३० हेक्टर पीक बाधित झाले होते़ बहुभूधारक असलेल्या ८ हजार ५२५ शेतकऱ्यांना आता थेट मदत मिळणार आहे़ यंदा २७ हजार ४५४ बहुभूधारक शेतकऱ्यांची जमीन पडीक झाली होती़ ६२४ हेक्टरच्या फळपीक क्षेत्राला शासनाची मदत मिळायला सोमवारपासून सुरूवात होणार आहे़तालुक्यातील वर्णाक्षरानुसार गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे़ अंजनसिंगी या गावापासून सुरूवात होणार आहे़ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायला सुरूवात होणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)
धामणगावातील शेतकऱ्यांना सात कोटी ७७ लाख
By admin | Published: January 11, 2015 10:44 PM