शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महापालिकेच्या तिजोरीत सात कोटींची भर

By admin | Published: November 15, 2016 12:11 AM

पंतप्रधानांचे नोटा बंदीचे धक्कातंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे - न्यारे करणारे ठरले आहे.

आयुक्तांचा पुढाकार : रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारल्यात नोटा अमरावती : पंतप्रधानांचे नोटा बंदीचे धक्कातंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे - न्यारे करणारे ठरले आहे. जी वसुली मार्चपर्यंतही शक्य झाली नसती ती अवघ्या तीन-चार दिवसांत रेकॉर्डब्रेकवर पोहोचली आहे. महापालिकेच्या तिजोरीत शुक्रवारपासून ६.७५ कोटी रुपये जमा झाल्याने यंत्रणेने घेतलेले परिश्रम फळास आले आहे.सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत जुने चलन स्वीकारणार असल्याबाबत महापालिकेने मोठी जनजागृती केली. त्याचा परिपाक आणि पाचशे व एक हजाराच्या नोटा घराबाहेर घालण्याच्या खटपटीत कर वसुलीचा आकडा सहा कोटीवर गेला आहे. मंगळवारी रात्री १२ पासून ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून रद्द होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थासह मजीप्रा, महावितरण, सिंचन पाणी पट्टीसाठी जुन्या पाचशे आणि १ हजारच्या नोटा स्वीकारार्ह राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याला १४ नोव्हेंबरची मुदतवाढही देण्यात आली. एलबीटी, मालमत्ता कर, बाजार परवाना शुल्क आणि बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याची सुवर्णसंधी महापालिकेने अमरावतीकरांना उपलब्ध करून दिली.शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत अनुक्रमे ३.६५ कोटी आणि ८१ लाख महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत ७८ लाख रुपये कर जमा झाल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.५१ कोटी रुपये महसूल गोळा झाला.मोहिमेचे शिलेदार : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाची सुवर्णसंधी म्हणून अंमलबजावणी करण्यासाठी सुटी असतानाही शेकडो महापालिका कर्मचारी राबले. आयुक्त, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त निवेदिता घार्गे, सोनाली यादव, महेश देशमुख, योगेश पिठे व मंगेश वाटाणे यांनी अधिनिस्थ कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रेकॉर्डब्रेक महसूल गोळा केला. नगरसचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता १ अनंत पोतदार, संजय पवार, मुख्य लेखापाल प्रेमदास राठोड,अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, उपअभियंता स्वप्निल जसवंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते व स्वास्थ निरीक्षकांवर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली होती.यंत्रणेचा सकारात्मक पुढाकार शुक्रवार व्यतिरिक्त शनिवार,रविवार आणि सोमवारी महापालिकेला सुटी होती.मात्र आयुक्त हेमंत पवार यांनी पुढाकार घेऊन करवसूलीसाठी सर्व अधिनिस्थ यंत्रणेला कामी लावले. रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यात आले.यंत्रणेतील प्रत्येकाची मदत घेऊन करवसूलीची मोहिम फत्ते करण्यात आली.त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह महापालिकेचा प्रत्येकच अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र ठरला.आयुक्तांनी काढले आदेशरद्द करण्यात आलेल्या ५०० आणि १ हजारांच्या नोटांमध्ये महापालिकेचे विविध कर भरण्यास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्तांनी खास आदेश काढलेत.महापालिकेच्याक वसूलीत मोठा फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी उपायुक्त ,सहायक आयुक्तांच्या साथीला ११ अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी सोपविली.सोमवारी रात्री १२ पर्यंत मालमत्ता कर वसूलेची कारवाई करावी तसेच दर एक तासाने वसूलीचा अहवाल सोशल मिडीयाच्या साह्याने सादर करावा आणि विविध करांची मोठ्या प्रमाणात वसूली करण्याचा प्रयत्न करावा.