लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : येथून आठ किमी अंतरावरील सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणाचे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणात १०० टक्के जलसंचय झाला असला तरी पाण्याचा येवा सुरू असल्याने धरणाच्या १३ पैकी सात दरवाजे १० सेंटिमीटरने उघडली आहेत. यातून ११४ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ९ सप्टेंबर रोजी तीन, तर मंगळवारी व बुधवारी प्रत्येकी दोन दारे उघडण्यात आली.धरणातील पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी व विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानले जाणाºया अप्पर वर्धा धरणात केवळ ११ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला होता. दोन-तीन वर्षांत अत्यल्प पाऊस कोसळल्यामुळे मोर्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला होता तसेच या धरणामधील कधी काळी पाण्याखाली बुडालेली गावे व मंदिरे जलाशयातील पाणी कमी झाल्यामुळे उघडी पडली होती.
उर्ध्व वर्धाचे सात दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
धरणातील पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी व विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
ठळक मुद्देतालुक्यात पावसाचा जोर : पर्यटकांच्या उत्साहाला उधाण