शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

सात कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:21 PM

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या झंझावती पाहणी दौºयाच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाने शुक्रवारी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित केले आहे. यात दोन स्वास्थ्य निरीक्षक, दोन कनिष्ट लिपिक व तीन बीटप्यूनचा समावेश आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांना २.५ लाखांचा दंड : आठ जणांना कारणे दाखवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या झंझावती पाहणी दौºयाच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाने शुक्रवारी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित केले आहे. यात दोन स्वास्थ्य निरीक्षक, दोन कनिष्ट लिपिक व तीन बीटप्यूनचा समावेश आहे.पालकमंत्र्यांना ज्या प्रभागात प्रचंड अस्वच्छता आढळून आली, त्या चार प्रभागांतील कंत्राटदारांना प्रत्येकी ५० हजार दंड आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, तर उस्माननगर, हाजरा नगर, गुलिस्तानगरमधील कचराविषयक तक्रारीवरून अन्य एका कंत्राटदाराला ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आयुक्त संजय निपाणे हे शुक्रवारी शहरात नसल्याने शनिवारी कारवाईचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी ‘लोकमत’ला दिली.शेगाव रहाटगाव, जमील कॉलनी, अंबापेठ व साईनगर प्रभागाच्या चार कंत्राटदारांसह अन्य एका संस्थेला प्रत्येकी ५० हजार रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. या चारही प्रभागात पालकमंत्र्यांना मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला होता. तर नाल्या तुडुंब भरल्याचे गंभीर निरिक्षण त्यांनी नोंदविले होते.पालकमंत्र्यांना विविध प्रभागासह सुकळी कंपोस्ट डेपोत स्वच्छतेविषयक ज्या अनियमितता आढळून आल्या, त्या अनुषंगाने या सात कर्मचाºयांचे निलंबन प्रस्तावित करण्यात आले आहे. आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस आठ स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरिक्षकांना पाठविण्यात येणार आहे. यात पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे, पाहणी दौºयाच्या अनुषंगाने फोन बंद करून ठेवणे व प्रत्यक्षात स्वच्छता कामात हयगय करणे, या कारणांचा समावेश आहे. स्वच्छता विभागाकडून शक्रवारीच ही कारवाई सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित करण्यात आली. तेथून उपायुक्त प्रशासन महेश देशमुख हे अंतिम कारवाई आयुक्त संजय निपाणे यांच्याकडे प्रस्तावित करतील.सोमवारी होणार कारवाईस्वच्छता विभागाने शुक्रवारी २० जणांविरुद्ध दंड, निलंबन व कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई प्रस्तावित केली. स्वास्थ्य अधीक्षक , वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) व आरोग्य अधिकारी असा प्रवास करुन ती नस्ती पुढील कारवाईसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली असली तरी शनिवार व रविवारी शासकीय सुटी असल्याने कारवाईचे आदेश सोमवारी काढले जातील, अशी माहिती आहे. तथापि, आयुक्त शनिवारी परतल्यानंतर आदेश निघण्याची शक्यता उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी वर्तविली.