लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शनिवारी मध्यरात्री घटांग येथे बिबट्याने गोठ्यातून सात शेळ्यांसह दहा कोंबड्या ठार केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पाळीव जनावरे फस्त करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.मेळघाट प्रादेशिक वनविभागा अंतर्गत घटांग येथील नामदेव ओझू बेलकर (३४) यांच्या गोठ्यातून सात शेळ्या व दहा कोंबड्या ठार केल्यात. मेळघाटात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने शनिवारी रात्री वीजपुरवठा सर्वत्र खंडित होता. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. रविवारी पहाटे नामदेव बेलकर गोठ्यात गेले असता, शेळ्या मृतावस्थेत दिसल्या. तर कोंबड्यांची पंख पडून होते. प्रादेशिक मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तेथेच आहे. घटांग वनपरिक्षेत्र अधिकारी निशा मोकाशे, वनपाल पी. व्ही. अळसपुरे यांनी पंचनामा केला.बिबट्याचा बंदोबस्त करातीन दिवसांपूर्वी शहापूर येथे बिबट्याने घरातील २५ शेळ्यांना ठार केले. गोरगरीब नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळल्याने मोबदला देण्यासह बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी नामदेव ओझू बेलकर, कैलास हरसुले, दीपेश बेलकर, विजय बेलकर, गजानन बेलकर, सहदेव बेलकर, संदीप आठवले, प्रकाश नागलेंनी केली.श्वानानंतर शेळ्यांवर तावउन्हाळ्यात चिखलदरा, सलोना, घटांग, बोरी, जामली, आमझरी या आदिवासी पाड्यांमध्ये गावातील मोकाट श्वानांची बिबट्यांनी शिकार केली होती. त्यानंतर बिबट आता थेट घरासह गोठ्यात बसून बकऱ्या व कोंबड्या फस्त करीत आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या, दहा कोंबड्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:23 PM
शनिवारी मध्यरात्री घटांग येथे बिबट्याने गोठ्यातून सात शेळ्यांसह दहा कोंबड्या ठार केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पाळीव जनावरे फस्त करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
ठळक मुद्देघटांगमध्ये धुमाकूळ सुरूच : तीन दिवसांतील दुसरी घटना