अमरावती: स्थानिक जिल्हा बँकेतील ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तत्कालिन सिईंओसह सात जणांनी शनिवारी न्यायालयात धाव घेतली. मात्र, याप्रकरणात तपास करणाºया आर्थिक गुन्हे शाखेने ‘से’ दाखल केला नसल्याने आरोपींच्या अटकपुर्व जामीन याचिकेवर आता २९ जून रोजी सुनावणी होणार आहे.
अटकपुर्व जामीन अर्ज दाखल करणाºयांमध्ये तत्कालीन सीईओ जयसिंग राठोड, राजेंद्र कडू, अजितपाल मोंगा, राजेंद्र गांधी, नीता
गांधी, पुरुषोत्तम रेड्डी व शिवकुमार गट्टाणी यांचा समावेश आहे. सत्र न्यायाधिश अग्रवाल यांच्या न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडून से वा अन्य दस्तावेज दाखल केले नसल्यामुळे आता २९ जुन रोजी सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाकडून परीक्षित गणोरकर यांनी बाजु मांडली.
एका खासगी कंपनीतील ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली दिली गेली. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली, अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी संदीप जाधव यांनी १५ जुन रोजी शहर कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाºया आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी बँकेतून संबंधित दस्तावेज ताब्यात घेतले होते. त्याअनुषंगाने न्यायालयात धाव घेण्यात आली.
---